सातारा जिल्ह्यातील विखळे वीज उपकेंद्राला आग

१२ गावे अंधारामध्ये

विखळे येथील वीज उपकेंद्रामध्ये लागलेली आग

सातारा – खटाव तालुक्यातील विखळे येथील वीज उपकेंद्रामध्ये आग लागून ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. या आगीमध्ये महावितरणची लाखो रुपयांची हानी झाली असून १२ गावे अंधारामध्ये आहेत. विखळे येथील वीज उपकेंद्रातील आगीमुळे परिसरातील कलेढोण, गारळेवाडी, गारुडी, तरसवाडी, मुळीकवाडी, पाचवड, औतडवाडी, ढोकळवाडी, पडळ, शिवरवाडी आणि कान्हरवाडी या १२ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वेळी ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी विटा नगरपालिका आणि सह्याद्री साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. एक ते दीड घंट्यांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.