कोरोना रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना भोजनाचे डबे पोच करण्याचे कार्य आम्ही कर्तव्य म्हणून करणार ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने ऑक्सिजन सिलिंडर आणि भोजनाचे डबे यांचा शुभारंभ करतांना नितीन चौगुले आणि त्यांचे कार्यकर्ते

सांगली, २७ एप्रिल – मागील वर्षांपासून महापूर असो अथवा कोरोनाचे संकट यांसह अन्य घटनांनी महाराष्ट्र चिंताग्रस्त आहे. एक राष्ट्रीय कर्तव्य समजून देशाने मला काय दिले यापेक्षा मी माझ्या देशाला काय देऊ शकतो, या उदात्त सामाजिक हेतूने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने भोजनाचे डबे, सॅनिटायझर, मास्क आणि ग्लोव्हसचे वाटप करण्यात आले. आता सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात असलेल्या कोरोना रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना भोजनाचे डबे पोच करण्याचे कार्य आम्ही कर्तव्य म्हणून करणार आहोत, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री. नितीन चौगुले यांनी दिली.

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात भरती असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांसाठी विनामूल्य भोजन आणि गरजू कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची सेवा देण्यास प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ज्यांना डबे हवे आहेत त्यांनी सचिन देसाई – ९४०५५ ५४०४०, जयदीप चेंडके ९५७९२ ७६१११, प्रकाश निकम – ९४०५४ ०२६२६, तसेच विनामूल्य ऑक्सिजनसाठी सचिन मोहिते ९४२३२ ६८५५८, विशाल चव्हाण – ८०८७१ २१२६१ यांना इच्छुकांनी संपर्क साधावा. कल्याणमध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने कोरोना रुग्णालय चालू करण्यात येणार असून त्याला मान्यता मिळाली आहे.

या वेळी सर्वश्री आनंदराव चव्हाण, प्रकाश निकम, डॉ. अभिषेक दिवाण, प्रदीप पाटील, सुरेंद्र इंगळे, सचिन देसाई, सचिन मोहिते, भूषण गुरव, जयदीप चेंडके उपस्थित होते.