१. हनुमान जयंतीच्या दिवशी ‘सकाळी ढगांमध्ये शेषासनावर परात्पर गुरु डॉ. आठवले विराजमान आहेत आणि त्यांच्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उभ्या आहेत’, असे दिसणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाआधी सकाळी ६.४५ वाजता मी खोलीबाहेरील आगाशीत आले. त्या दिवशी हनुमान जयंती होती. माझे लक्ष आकाशाकडे गेले. त्या वेळी सूर्यदेव पांढर्या गोळ्याप्रमाणे दिसत होता. त्याच्या बाजूला असलेल्या पांढर्या ढगांमध्ये शेषासनावर परात्पर गुरु डॉ. आठवले विराजमान असून त्यांच्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उभ्या होत्या.
२. ‘ढगांपासून गरुडाची आकृती निर्माण होऊन त्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले बसले आहेत’, असे दिसणे आणि ‘ते साधकांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर आले आहेत’, असे वाटणे
‘थोड्या वेळाने त्याच ढगांपासून गरुडाची आकृती निर्माण झाली आणि त्यावर परात्पर गुरु डॉक्टर बसले होते. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर आले आहेत’, असा माझ्या मनात विचार आला. नंतर त्या ढगांपासून मोराची आकृती निर्माण झाली. तेव्हा मोराची पिसेही दिसत होती. त्या वेळी मनात विचार आला, ‘मोरावर बसून देवीही आली आहे.’ मला आतून पुष्कळ आनंद होत होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘रामनवमीच्या दिवशी असे दिसले नाही. आज कसे दिसले ?’ तेव्हा आतून उत्तर आले, ‘देव भक्तासाठी धावून येतो; म्हणून ‘हनुमान जयंती’च्या दिवशी देवाने दर्शन दिले.’
– श्रीमती शोभा चांदणे, सनातन आश्रम, मिरज
|