पिंपरी – शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. काही रुग्णांना रुग्णालयात खाट मिळत नाही तर काहींना खाट अभावी प्राण गमवावे लागत आहेत; मात्र अशा परिस्थितीत महापालिकेने उभारलेल्या कोविड केअर सेंटर मधील ५० प्रतिशतहून अधिक खाटा रिकाम्या आहेत. पालिकेने शहराच्या विविध भागांत उभारलेल्या सेंटरमध्ये १ सहस्र २५० खाटांची व्यवस्था असून त्यातील ६२९ खाटा रिकाम्या आहेत, तर ६२१ रुग्ण येथे उपचार घेत आहेत.