सांगली – टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या पाणीवाटप आणि पाणीपट्टी वसुलीसाठीची व्यवस्था कार्यक्षम अन् प्रभावी करावी. या योजना सौर ऊर्जेवर चालवण्याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करावा, अशा सूचना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. सांगली पाटबंधारे विभाग येथील विश्रामगृहात पालकमंत्री जयंत पाटील यांनी टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प योजनांविषयी आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी सिंचन योजनांच्या पाणीवाटपाविषयी आणि पाणीपट्टी वसुलीविषयी योग्य नियोजन करण्याविषयी सूचना देऊन सांगली, वाळवा, कासेगाव, समडोळी येथील पूरसंरक्षक कामे, डिग्रज, बोरगाव, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुरुस्ती कामे, आरफळ आणि कृष्णा कालवा लायनिंग कामे, मंत्रालयीन स्तरावरील प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेतला.