‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक रूपांत म्हटलेला नामजप हळू, मध्यम आणि मोठा या ३ आवाजांत ऐकणे’, या प्रयोगांच्या वेळी आलेल्या अनुभूती


२१ एप्रिल २०२१ या दिवशी रामनवमी आहे. यानिमित्ताने…


नामजपाविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘१५.८.२०२० या दिवशी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक रूपात म्हटलेला नामजप ऐकण्याचे प्रयोग घेण्यात आले. या प्रयोगांमध्ये हा नामजप प्रथम हळू आवाजात, नंतर मध्यम आवाजात आणि शेवटी मोठ्या आवाजात प्रत्येकी १ घंटा ऐकवण्यात आला. प्रत्येक प्रयोगानंतर नामजपाच्या झालेल्या परिणामातून सामान्य स्थितीला येण्यासाठी १ घंट्याचा अवकाश ठेवण्यात आला होता. तसेच प्रयोग १६.८.२०२० या दिवशी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा मारक रूपात म्हटलेला नामजप ऐकण्याचे घेण्यात आले. या प्रयोगांच्या वेळी मला आलेल्या सूक्ष्मातील अनुभूती येथे दिल्या आहेत.

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक रूपात म्हटलेला नामजप

१ अ. नामजप हळू आवाजात ऐकणे

१. आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

२. श्रीरामाचा तारक रूपातील नामजप हळू आवाजात ऐकणे आरंभ केल्यावर मला माझ्या मणिपूरचक्रावर नामजपाची स्पंदने जाणवू लागली. ती स्पंदने थोडी उष्ण स्वरूपाची होती.

३. त्यानंतर लगेचच नामजपाची स्पंदने मला माझ्या मूलाधारचक्रावर जाणवू लागली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

४. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने मला रामाच्या नामजपाची स्पंदने मूलाधारचक्रापासून वरच्या वरच्या चक्रांवर जाणवू लागली आणि शेवटी ती आज्ञाचक्रावर जाणवली. तेव्हा माझी सूर्यनाडी कार्यरत झाली.

५. पुन्हा नामजपाची स्पंदने माझ्या खालच्या खालच्या चक्रांवर जाणवू लागली आणि शेवटी ती मूलाधारचक्रावर जाणवली. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी पुन्हा कार्यरत झाली.

६. अशा प्रकारे ‘रामाच्या तारक नामजपाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवल्यावर त्यानंतर ती वरच्या वरच्या चक्रांवर जाणवून शेवटी ती आज्ञाचक्रावर जाणवणे आणि त्यानंतर पुन्हा नामजपाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवणे’, हे नामजपाच्या स्पंदनांचे आवर्तन मला पुनःपुन्हा जाणवत होते. मिनिटभरात हे आवर्तन एकदा होत होते. नामजपाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवल्यावर सुषुम्ना नाडी आणि आज्ञाचक्रावर जाणवल्यावर सूर्यनाडी कार्यरत होत होती. तसेच मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवल्यावर ती स्पंदने काही प्रमाणात पायांवाटे भूमीकडेही जात होती.

७. श्रीरामाचा तारक रूपातील नामजप हळू आवाजात ऐकतांना वरीलप्रमाणे नामजपाच्या स्पंदनांची आवर्तने जाणवण्याचे कारण म्हणजे कुंडलिनीशक्तीचे वर-खाली होणे. तारक रूपातील नामजप हळू आवाजात ऐकल्याने शरीरशुद्धी होऊन नामजपाची स्पंदने मूलाधारचक्रापर्यंत गेल्यानंतर ती वातावरणात प्रक्षेपित होण्यासाठी वरच्या वरच्या चक्रांवर जाऊन आज्ञाचक्रापर्यंत गेली; पण त्यापुढे ती सहस्रारचक्रापर्यंत जाऊ शकली नाहीत. याचे कारण म्हणजे तो नामजप हळू आवाजात असल्याने त्याची स्पंदने आज्ञाचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत पोचण्यासाठी तेवढी ऊर्जा पुरेशी पडत नव्हती.

८. आज्ञाचक्रावर नामजपाची स्पंदने जाणवल्यावर ती सहस्रारचक्रापर्यंत जाण्यासाठी मी मुद्रा शोधली असता ती ‘तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’, ही मुद्रा जाणवली. ती केल्यावर नामजपाची स्पंदने सहस्रारचक्रापर्यंत जाऊन माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली आणि पुढे स्पंदने सहस्रारचक्रातून वातावरणात प्रक्षेपित होऊ लागली. त्या मुद्रेमुळे ‘नामजपाची स्पंदने मूलाधारचक्राच्या माध्यमातून पायांवाटे भूमीमध्ये आणि सहस्रारचक्राद्वारे वातावरणात’ अशी एकाच वेळी दोन्हीकडे प्रक्षेपित होत होती. त्यामुळे तेव्हा एकाच वेळी भूमीची, तसेच वातावरणाची शुद्धी होत होती. मी ती मुद्रा करून जप ऐकू लागल्यावर माझे ध्यान लागले.

१ आ. नामजप मध्यम आवाजात ऐकणे

१. आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

२. श्रीरामाचा तारक रूपातील नामजप मध्यम आवाजात ऐकणे आरंभ केल्यावर प्रथम मला माझ्या मणिपूरचक्रावर नामजपाची स्पंदने जाणवू लागली. ती स्पंदने थोडी उष्ण स्वरूपाची होती.

३. त्यानंतर ती स्पंदने अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा या चक्रांवर जाणवून शेवटी ती सहस्रारचक्रावर जाणवली. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

४. त्यानंतर नामजपाची स्पंदने सहस्रारचक्रापासून खालच्या खालच्या चक्रांवर जाऊन शेवटी ती मूलाधारचक्रावर जाणवली.

५. पुढे नामजपाची स्पंदने पुन्हा माझ्या मणिपूरचक्रावर जाणवू लागली. तेव्हा माझी सूर्यनाडी कार्यरत झाली. मी ‘तर्जनीच्या मुळाशी अंगठ्याचे टोक लावणे’, ही मुद्रा केल्यावर नामजपाची स्पंदने माझ्या मूलाधारचक्रावर जाणवून ‘पुढे ती माझ्या पायांवाटे भूमीमध्ये जात आहेत’, असे मला जाणवू लागले. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली होती.

६. ‘श्रीरामाचा तारक रूपात आणि मध्यम आवाजात म्हटलेल्या नामजपाची स्पंदने सहस्रारचक्रावर जाणवतात आणि तो नामजप वातावरणावर परिणाम करतो’, असे लक्षात आले; पण हा नामजप मूलाधारचक्रावाटे भूमीवर परिणाम करण्यासाठी ‘तर्जनीच्या मुळाशी अंगठ्याचे टोक लावणे’, ही मुद्रा करावी लागली.

१ इ. नामजप मोठ्या आवाजात ऐकणे

१. आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

२. श्रीरामाचा तारक रूपातील नामजप मोठ्या आवाजात ऐकणे आरंभ केल्यावर प्रथम मला माझ्या आज्ञाचक्रावर नामजपाची स्पंदने जाणवू लागली.

३. त्यानंतर नामजपाची स्पंदने सहस्रारचक्रावर जाणवू लागली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. ‘नामजपाची स्पंदने माझ्या सहस्रारचक्रातून वातावरणात हळूवारपणे प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.

४. त्यानंतर माझे ध्यान लागले.

२. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’  हा मारक रूपात म्हटलेला नामजप

२ अ. नामजप हळू आवाजात ऐकणे

१. आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

२. श्रीरामाचा मारक रूपातील नामजप हळू आवाजात ऐकणे आरंभ केल्यावर प्रथम मला माझ्या
मणिपूरचक्रावर नामजपाची स्पंदने जाणवू लागली. ती स्पंदने उष्ण स्वरूपाची होती.

३. त्यानंतर नामजपाची स्पंदने मणिपूरचक्राच्या वरच्या वरच्या चक्रांवर जाणवून शेवटी ती आज्ञाचक्रावर जाणवली. तेव्हाही माझी सूर्यनाडीच कार्यरत होती. आज्ञाचक्राच्या वर सहस्रारचक्रापर्यंत नामजपाची स्पंदने गेली नाहीत.

४. त्यानंतर नामजपाच्या स्पंदनांचा आज्ञाचक्रापासून खालच्या खालच्या चक्रांवर प्रवास आरंभ झाला आणि शेवटी मला मूलाधारचक्रावर नामजपाची स्पंदने जाणवली.

५. मूलाधारचक्रावर नामजपाची स्पंदने जाणवल्यावर माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली नाही; कारण नामजपाची स्पंदने काही सेकंदच मूलाधारचक्रावर जाणवून त्या स्पंदनांचा प्रवास मूलाधारचक्रापासून वरच्या वरच्या चक्रांच्या दिशेने आरंभ झाला आणि पुन्हा आज्ञाचक्रावर नामजपाची स्पंदने जाणवू लागली. तिथे ती मिनिटभर जाणवून पुन्हा त्यांचा प्रवास मूलाधारचक्राच्या दिशेने होऊ लागला. या प्रयोगामध्ये नामजपाच्या स्पंदनांची आवर्तने ‘आज्ञाचक्र ते मूलाधारचक्र आणि मूलाधारचक्र ते आज्ञाचक्र’, अशी जाणवत होती.

६. श्रीरामाचा मारक रूपातील नामजप हळू आवाजात ऐकतांना नामजपाच्या स्पंदनांचा परिणाम ना वातावरणावर जाणवला, ना भूमीवर. तो केवळ देहावर जाणवला. त्यामुळे श्रीरामाचा मारक रूपातील नामजप हळू आवाजात ऐकणे, हे समष्टीसाठी लाभदायक न जाणवता केवळ व्यष्टीसाठी लाभदायक असल्याचे जाणवले.

७. श्रीरामाचा मारक रूपातील नामजप हळू आवाजात ऐकतांना समष्टीवर, म्हणजे वातावरण आणि भूमी यांवर परिणाम होण्यासाठी हाताच्या बोटांची कोणतीही मुद्रा लाभदायक ठरली नाही.

२ आ. नामजप मध्यम आवाजात ऐकणे

१. आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

२. श्रीरामाचा मारक रूपातील नामजप मध्यम आवाजात ऐकणे आरंभ केल्यावर मला माझ्या मणिपूरचक्रावर नामजपाची स्पंदने जाणवू लागली. ती स्पंदने उष्ण स्वरूपाची होती.

३. त्यानंतर नामजपाची स्पंदने मणिपूरचक्रापासून वरच्या वरच्या चक्रांवर जाणवून शेवटी ती सहस्रारचक्रावर जाणवली; पण ती स्पंदने वातावरणात प्रक्षेपित न होता माझ्या डोक्यावर जमा होत होती. त्यामुळे माझ्या डोक्यावर वजनदार गाठोडे असल्याप्रमाणे जडत्व जाणवत होते. त्या वेळी माझी सूर्यनाडीच कार्यरत होती.

४. मी माझ्या डोक्यावर साचलेली नामजपाची शक्ती वातावरणात प्रक्षेपित होण्यासाठी माझे दोन्ही हात मांडीवर ठेवून हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने केले. तेव्हा नामजपाची शक्ती वेगाने वरच्या दिशेने वातावरणात जाऊ लागली. त्यामुळे मला डोक्यावर हलके वाटू लागले. तसेच माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

२ इ. नामजप मोठ्या आवाजात ऐकणे

१. आरंभी माझी सूर्यनाडी कार्यरत होती.

२. श्रीरामाचा मारक रूपातील नामजप मोठ्या आवाजात ऐकणे आरंभ केल्यावर मला माझ्या आज्ञाचक्रावर नामजपाची स्पंदने जाणवू लागली.

३. त्यानंतर नामजपाची स्पंदने सहस्रारचक्रावर जाणवली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

४. नामजपाची स्पंदने सहस्रारचक्रातून वातावरणात प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.

५. या नामजपाच्या वेळीसुद्धा मला ‘माझ्या डोक्यावर नामजपाच्या शक्तीचे मोठे गाठोडे आहे’, असे जाणवत होते. ‘ते शक्तीचे गाठोडे लोंबून माझ्या नाकापर्यंत खाली आले आहे’, असेही मला जाणवत होते. ते शक्तीचे गाठोडे हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने केल्यावर थोड्या प्रमाणात न्यून झाले.

३. निष्कर्ष

३ अ. श्रीरामाचा तारक रूपातील नामजप हळू आवाजात ऐकणे

१. या प्रयोगामध्ये ‘नामजपाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवल्यावर त्यानंतर ती वरच्या वरच्या चक्रांवर जाणवून शेवटी ती आज्ञाचक्रावर जाणवणे आणि त्यानंतर पुन्हा नामजपाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवणे’, हे नामजपाच्या स्पंदनांचे आवर्तन पुनःपुन्हा जाणवत होते.

२. नामजपाच्या स्पंदनांची आवर्तने जाणवण्याचे कारण म्हणजे कुंडलिनीशक्तीचे वर-खाली होणे.

३. नामजपाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवल्यावर सुषुम्ना नाडी आणि आज्ञाचक्रावर जाणवल्यावर सूर्यनाडी कार्यरत होत होती. तसेच मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवल्यावर ती स्पंदने काही प्रमाणात पायांवाटे भूमीकडेही जात होती.

४. हा नामजप हळू आवाजात ऐकल्याने शरीरशुद्धी होऊन नामजपाची स्पंदने मूलाधारचक्रापर्यंत गेल्यानंतर ती वातावरणात प्रक्षेपित होण्यासाठी वरच्या वरच्या चक्रांवर जाऊन आज्ञाचक्रापर्यंत गेली; पण त्यापुढे ती सहस्रारचक्रापर्यंत जाऊ शकली नाहीत. याचे कारण म्हणजे तो नामजप हळू आवाजात असल्याने त्याची स्पंदने आज्ञाचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत पोचण्यासाठी तेवढी ऊर्जा पुरेशी पडत नव्हती.

५. हा नामजप ऐकतांना ‘तर्जनीच्या टोकाला अंगठ्याचे टोक लावणे’, ही मुद्रा केल्यावर नामजपाची स्पंदने ‘मूलाधारचक्राच्या माध्यमातून पायांवाटे भूमीमध्ये आणि सहस्रारचक्राद्वारे वातावरणात’ अशी एकाच वेळी दोन्हीकडे प्रक्षेपित झाली. त्यामुळे एकाच वेळी भूमीची, तसेच वातावरणाची शुद्धी झाली, तसेच माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

३ आ. श्रीरामाचा तारक रूपातील नामजप मध्यम आवाजात ऐकणे

१. या नामजपाची स्पंदने प्रथम मणिपूरचक्रावर जाणवली आणि त्यानंतर ती वरच्या वरच्या चक्रांवर
जाणवून शेवटी सहस्रारचक्रावर जाणवली. तेव्हा सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

२. ‘नामजपाची स्पंदने सहस्रारचक्रावर जाणवल्यावर पुढे ती वातावरणावर परिणाम करू लागली’, असे लक्षात आले; पण हा नामजप मूलाधारचक्रावाटे भूमीवर परिणाम करण्यासाठी ‘तर्जनीच्या मुळाशी अंगठ्याचे टोक लावणे’, ही मुद्रा करावी लागली.

३ इ. श्रीरामाचा तारक रूपातील नामजप मोठ्या आवाजात ऐकणे

१. या नामजपाची स्पंदनेही सहस्रारचक्रावर जाणवली आणि सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

२. ‘नामजपाची स्पंदने सहस्रारचक्रातून वातावरणात हळूवारपणे प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवले.

३. या नामजपाने मूलाधारचक्रावर परिणाम न केल्याने त्याने भूमीवर परिणाम केल्याचे जाणवले नाही.

३ ई. श्रीरामाचा मारक रूपातील नामजप हळू आवाजात ऐकणे

१. या प्रयोगामध्ये नामजपाच्या स्पंदनांची आवर्तने ‘आज्ञाचक्र ते मूलाधारचक्र आणि मूलाधारचक्र ते आज्ञाचक्र’,  अशी जाणवत होती; पण कोणत्याही वेळी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली नाही.

२. हा नामजप ऐकतांना त्याच्या स्पंदनांचा परिणाम ना वातावरणावर जाणवला, ना भूमीवर. तो केवळ देहावर जाणवला.

३. या नामजपाचा परिणाम समष्टीवर, म्हणजे वातावरण आणि भूमी यांवर होण्यासाठी हाताच्या बोटांची कोणतीही मुद्रा लाभदायक ठरली नाही.

३ उ. श्रीरामाचा मारक रूपातील नामजप मध्यम आवाजात ऐकणे

१. या नामजपाच्या स्पंदनांनी देहाची शुद्धी केल्याचे जाणवले नाही.

२. या नामजपाची स्पंदने थेट सहस्रारचक्रावर जाणवली; पण ‘ती स्पंदने वातावरणात प्रक्षेपित न होता डोक्यावर जमा होत आहेत’, असे जाणवले. त्यामुळे डोक्यावर वजनदार गाठोडे असल्याप्रमाणे जडत्व जाणवत होते.

३. दोन्ही हात मांडीवर ठेवून हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने केल्यावर नामजपाची शक्ती वेगाने वरच्या दिशेने वातावरणात जाऊ लागली. त्यामुळे डोक्यावर हलके वाटू लागले, तसेच सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

३ ऊ. श्रीरामाचा मारक रूपातील नामजप मोठ्या आवाजात ऐकणे

१. या नामजपाची स्पंदने सहस्रारचक्रातून वातावरणात प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.

२.  माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

३. या नामजपाच्या वेळीसुद्धा ‘माझ्या डोक्यावर नामजपाच्या शक्तीचे मोठे गाठोडे आहे’, असे जाणवत होते. ते शक्तीचे गाठोडे हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने केल्यावर थोड्या प्रमाणात न्यून झाले.

४. श्रीरामाच्या तारक आणि मारक रूपांतील नामजपांमधील भेद

अ. श्रीरामाच्या तारक रूपातील नामजपाची स्पंदने थोडी उष्ण, तर मारक रूपातील नामजपाची स्पंदने अधिक उष्ण जाणवली.

आ. श्रीरामाचा तारक रूपातील नामजप देहाची आणि थोड्या प्रमाणात वातावरणाचीही शुद्धी करतो, तर मारक रूपातील नामजप अधिकतर वातावरणाची शुद्धी करतो.

इ. श्रीरामाचा तारक रूपातील नामजप हळू आणि मध्यम आवाजात ऐकणे लाभदायक आहे, तर मारक रूपातील नामजप केवळ मोठ्या आवाजात ऐकणे लाभदायक आहे.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.  (१५.११.२०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.