विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार मी काही विकारांवर जप बनवले. ‘कोरोना विषाणूं’ची बाधा दूर करण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावरून मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली. हे जप म्हणजे आवश्यक त्या वेगवेगळ्या देवतांचे एकत्रित जप आहेत. मी शोधलेले हे जप साधकांना त्यांच्या विकारांवर देत आहे. ‘त्या जपांचा त्यांना चांगला लाभ होत आहे’, असे त्यांनी सांगितल्यावर लक्षात आले. काही मासांपूर्वी काही विकार, त्यांवरील जप आणि साधकांनी तो जप केल्यावर त्यांना आलेल्या अनुभूती दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये छापल्या होत्या. आज आणखी काही विकार आणि त्यांवरील जप येथे दिले आहेत. हे नामजप गेल्या ३ महिन्यांत काही साधकांना दिले आहेत. त्यांनी त्यांना आलेल्या अनुभूती लवकरात लवकर ग्रंथासाठी लिहून या लेखात दिलेल्या इ-मेल पत्त्यावर किंवा टपालाच्या पत्त्यावर पाठवाव्यात.

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.४.२०२१)

साधकांना येथे नमूद केलेल्या विकारांपैकी एखादा विकार असल्यास तो दूर करण्यासाठी ‘त्या संदर्भात दिलेला नामजप करून बघावा’, असे वाटले, तर त्यांनी तो नामजप १ मास (महिना) प्रतिदिन १ घंटा प्रयोग म्हणून करून बघावा. या नामजपाच्या संदर्भात येणार्‍या अनुभूती साधकांनी [email protected] या इ-मेल पत्त्यावर किंवा पुढील टपालाच्या पत्त्यावर पाठवाव्यात. साधकांच्या या अनुभूती ग्रंथात घेण्याच्या दृष्टीने, तसेच नामजपाची योग्यता सिद्ध होण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरतील.

टपालाचा पत्ता : सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१.