जगातील ४४ प्रकारचे हँड सॅनिटायजरमुळे कर्करोग होण्याचा धोका ! – अभ्यासातील निष्कर्ष  

नवी देहली – कोरोनाच्या विषाणूपासून बचाव होण्यासाठी जगभरात हाताला सॅनिटायजर लावण्यात येत आहे. याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. जगभरात असे ४४ प्रकारचे हँड सॅनिटायजर लोकांमध्ये कर्करोग पसरवण्यास कारणीभूत ठरत आहेत, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

न्यू हेवन येथील ऑनलाईन औषध आस्थापन ‘वॅलिजर’ने जगभरातील २६० प्रकारच्या हँड सॅनिटायजरचा अभ्यास केला आहे. त्यांतील ४४ प्रकारच्या हँड सॅनिटायजरमध्ये माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे, अशा रसायनांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. या रसायनांच्या सतत संपर्कात आल्याने कर्करोग होण्याचा धोका निर्माण होत आहे. या ४४ प्रकारच्या हँड सॅनिटायजरमध्ये वापरण्यात येणारे रसायन लोकांच्या त्वचेसाठी अतिशय धोकादायक आहे.