महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

मुंबई – ठाकरे सरकार राज्यातील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिली आहे.

या पत्रात नारायण राणे यांनी लिहिले आहे की, दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत ही प्रकरणे सचिन वाझे यांनी हाताळली. सचिन वाझे यांना या प्रकरणात कुणाला तरी वाचवण्यासाठी पाठवण्यात आले होते. सचिन वाझे यांचे अन्वेषण मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणातच नाही, तर याआधी त्यांनी हाताळलेल्या गुन्ह्यांमध्येही पुन्हा अन्वेषण करण्यात यावे.