उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अन्वी प्रवीण चौगुले ही एक आहे !
माघ शुक्ल पक्ष पंचमी (१६.२.२०२१) या दिवशी चि. अन्वी चौगुले (वय ४ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
चि. अन्वी प्रवीण चौगुले हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
‘गर्भारपणात मी प्रार्थना करत असे. त्या वेळी मी सकारात्मक विचार करायचे, तसेच जप करायचे. त्या कालावधीत मला कोणताही त्रास झाला नाही.
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते ५ मास
२ अ १. जन्मानंतर दोन मास चि. अन्वी संध्याकाळी १ घंटा रडायची.
२ अ २. श्रीकृष्णाचे चित्र दाखवल्यावर शांत बसणे : आमच्या घरासमोर रहाणार्या काकू (सौ. इंदिरा भट) सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. त्यांच्या घरी दरवाजाला कृष्णाचे चित्र लावले आहे. अन्वी लहान असतांना त्यांच्या घरी जायची. त्या वेळी काकूंनी तिला श्रीकृष्णाचे चित्र दाखवले की, ती शांत बसायची.
२ आ. वय ६ ते १२ मास
२ आ १. सात्त्विकतेची आवड : श्री. नारायणकाका (भटकाकूंचे यजमान) पूजा करत असतांना ती पूजा पहात बसायची. ती घरी असलेल्या दत्त, कृष्ण आणि हनुमान यांच्या चित्राकडे बोट करून दाखवायची. ती रडत असेल, तर कृतज्ञतागीत लावल्यावर शांत बसायची. ती प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन ऐकायची.
२ इ. वय १ ते २ वर्षे
१. ती प्रवासात कधीही त्रास देत नाही.
२. कोणाला काही लागले, तर ‘पावडर लावू’, असे म्हणत असे. (ती विभूतीला ‘पावडर’ म्हणत असे.) ती हात आणि पाय यांना विभूती लावत असे.
३. भटकाकू करत असलेले नामजपादी सर्व आध्यात्मिक उपाय ती करायची.
२ ई. वय २ ते ४ वर्षे
२ ई १. तिची स्मरणशक्ती चांगली आहे. सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात रहातात.
२ ई २. प्रेमळ : ती सगळ्यांशी मिळून-मिसळून वागते. तिला लोक घरी आलेले आवडतात. घरी आलेल्यांना ती ‘या, चहा पाहिजे का ?’, असे विचारते.
२ ई ३. ऐकण्याची वृत्ती : भटकाकूंच्या घरी गेली की, ती प्रथम ‘हॅलो’ म्हणायची. काकूंनी ‘तसे म्हणायचे नाही, नमस्कार म्हणायचे’, असे सांगितल्यापासून ती ‘नमस्कार’ म्हणते.
२ ई ४. सात्त्विक गोष्टींची आवड
अ. ती सात्त्विक पदार्थच खाते. कांदा, लसूण घातलेले आणि तिखट पदार्थ ती खात नाही.
आ. भटकाकूंच्या घरी असलेले हनुमानाचे चित्र आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अन् प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे ती ओळखते.
इ. ती मधूनच जयघोष करते, तसेच नामजप करते. मंदिरात गेल्यावर सद्गुरु, कृष्ण किंवा गणपतीची आरती म्हणते.
ई. ती कृष्णाशी बोलते. ती म्हणते, ‘‘श्रीकृष्णा, ये ये. बस माझ्या मांडीवर.’’
उ. गणेशोत्सवाच्या वेळी गणपति आणतांना ती उड्या मारत मोठमोठ्याने आनंदाने जयघोष करते. तिला सण-उत्सव पुष्कळ आवडतात.
३. स्वभावदोष : ‘हट्टीपणा’
– सौ. विद्या प्रवीण चौगुले (आई), विश्रामबाग, सांगली. (३०.८.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |