भावी पिढीवर सुसंस्कार करणार्‍या सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी १०.१.२०२४ पर्यंत घ्या !

साधकांना सूचना आणि कृतीशील धर्मप्रेमींना नम्र विनंती !

१. बाजारात उपलब्ध असलेल्या वह्या आणि सनातनच्या ‘संस्कार वह्या’ यांमधील मूलभूत भेद !

‘सध्या विविध आस्थापनांच्या वह्या बाजारात उपलब्ध आहेत. या वह्यांवर सिनेसृष्टीतील विविध अभिनेते-अभिनेत्री, खेळाडू, प्राणी आदींच्या चित्रांना प्रसिद्धी दिलेली असते. याउलट सनातनच्या ‘संस्कार वही’चे वैशिष्ट्य, म्हणजे या वहीवर विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणारे, त्यांना हिंदु संस्कृतीचे पालन करण्यास शिकवून त्यांच्यात धर्मप्रेम जागवणारे, धर्मशिक्षण देणारे आणि राष्ट्रप्रेम वाढवणारे लिखाण अन् चित्रे असतात. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांना नव्हे, तर पालक आणि शिक्षक या सर्वांनाच आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा मिळू शकते.

२. सनातनच्या ‘संस्कार वह्यां’च्या खरेदीवर आकर्षक सवलत उपलब्ध !

३. सनातनच्या ‘संस्कार वही’चे प्रकार आणि वह्यांचे मूल्य

४. सनातनच्या ‘संस्कार वही’चे महत्त्व जाणून अधिकाधिक जणांकडून वह्यांची मागणी घ्या !

विद्यार्थ्यांच्या मनावर आदर्श विचार आणि उज्ज्वल इतिहास रुजवणारी ही वही घरोघरी पोचायला हवी. याचा प्राथमिक टप्पा म्हणून साधक आणि कृतीशील धर्मप्रेमी यांनी समाजातील पुढील घटकांकडून वह्यांची मागणी घेण्यासाठी प्रयत्न करावेत.

अ. शाळेचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून वहीची मागणी घेता येईल. शिकवणीवर्गांच्या (क्लासेसच्या) चालकांनाही वह्यांची मागणी देण्याविषयी प्रवृत्त करावे.

आ. मागणी घेण्यासाठी स्टेशनरीच्या साहित्याची विक्री करणार्‍या दुकानदारांना संपर्क करता येईल.

इ. काही लोकप्रतिनिधी (नगरसेवक, आमदार, खासदार आदी) त्यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या आदी शालोपयोगी वस्तूंचे मोठ्या संख्येत वाटप करतात. त्यांना वह्यांविषयी अवगत करून मागणी देण्यासाठी प्रवृत्त करावे.

ई. सनातनच्या संपर्कात असलेले ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, अर्पणदाते आणि विज्ञापनदाते यांना वह्यांच्या मागणीसाठी संपर्क करावा. धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनाही याविषयी माहिती द्यावी.

उ. नोकरी करणार्‍या साधकांनी त्यांच्या कार्यालयातील सहकार्‍यांना वह्यांचे महत्त्व सांगून मागणी घ्यावी.

ऊ. आप्त, स्नेही, शेजारी आदींना वैयक्तिक वापरासाठी वा वाढदिवसानिमित्त इतरांना भेट स्वरूपात देण्यासाठी वह्यांची मागणी करण्यास सुचवावे.

५. वर्ष २०२४ साठी आवश्यक वह्यांची मागणी १०.१.२०२४ पर्यंत कळवा !

सर्व जिल्ह्यांनी वर्ष २०२४ साठी आवश्यक सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची समाजातून मागणी घ्यावी. उत्तरदायी साधकांनी मागणी योग्य आणि अभ्यासपूर्वक असल्याची निश्चिती करून ती ‘गूगल शीट’मध्ये नोंदवावी. समाजातून वर्षभर वह्यांची मागणी असते. त्या दृष्टीने साधक आणि वितरक वर्षभरासाठी वह्या खरेदी करून त्यांचे वितरण करू शकतात. (१९.१२.२०२३)

जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी.