धर्माभिमानी आणि साधक !

‘धर्माभिमानी हिंदुत्वाचा प्रसार आणि रक्षण यांचे कार्य करतात. साधक धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांच्या कृती समष्टी साधना म्हणून करतात. दोघांच्या कृती जरी दिसतांना सारख्या दिसत असल्या, तरी त्यांच्यामध्ये पुढील भेद आहेत.

१. धर्माभिमानी आणि साधक यांतील भेद


टीप – ‘धर्मलोक’ हा स्वर्गलोक आणि महर्लोक यांच्यामधील लोक आहे. या लोकामध्ये धर्मासाठी तन,मन, धन किंवा प्राण यांचा त्याग केलेले धर्मात्मे जातात.

कु. मधुरा भोसले

२. धर्माभिमान्यांनी धर्माभिमान जोपासण्यासह साधना केल्यामुळे त्यांची वाटचाल साधकत्वाकडे चालू होणे

जेव्हा धर्माभिमानी साधना करू लागतात, तेव्हा त्यांच्यामधील साधकत्व जागृत होऊन ते वाढू लागते आणि त्यांची वाटचाल धर्माभिमान्यांकडून साधकत्वाकडे होऊ लागते.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०१९, रात्री १०.५५)

  •  सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  •  सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.