बालभारतीच्या कार्यालयासमोरच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात घोषणा

शाळांकडून मनमानी पद्धतीने केलेल्या शुल्कवाढीच्या विरोधात पुण्यातील पालक आक्रमक 

वर्षा गायकवाड यांच्या विरोधात घोषणा देताना पालक

पुणे – येथील खासगी शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वाढ करण्यात आली आहे. २७ जानेवारी या दिवशी बालभारती संस्थेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पुण्यात आल्या असतांना शाळांकडून वाढवण्यात आलेले शुल्क आणि इतर मागण्या यांचे निवेदन पालकांच्या संघटनेने त्यांना दिले; मात्र गायकवाड यांच्याकडून या संदर्भात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालक आक्रमक झाले आणि त्यांनी बालभारतीच्या कार्यालयासमोरच वर्षा गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यास प्रारंभ केला.

यावर खासगी शाळांनी मनमानी पद्धतीने शुल्क वसुल करू नये, यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली होती; मात्र त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने हा प्रश्‍न न्यायप्रविष्ट असल्याचे गायकवाड यांनी पालकांना सांगितले. खासगी शाळांच्या मनमानीविषयी ठोस निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही, तर ३० जानेवारीला वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असे पालक संघटनांच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे यांनी सांगितले.