२८.४.२०१९ या दिवशी मी ध्यानमंदिरात उपायांना बसले होते. तेव्हा प.पू. बाबांशी (प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी) माझा सूक्ष्मातून पुढील संवाद झाला.
मी : प.पू. बाबा, मी तुमच्या चरण पादुकांचे दर्शन घेतले आणि धन्य झाले, तरी मला एक अडचण आहे.
प.पू. बाबा : तुझी अडचण काय आहे ?
मी : प.पू. बाबा, माझ्या हृदयात उजव्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या पादुका आहेत. मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका आहेत आणि डाव्या बाजूला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या पादुका आहेत. मी तुमच्या पादुका कुठे ठेवू ?, हेच मला कळत नाही.
प.पू. बाबा : त्या तुझ्या डोक्यावर ठेव, म्हणजे डोके शांत राहील.
मी प.पू. बाबा मला असे का म्हणाले ?, असा विचार करत होते. त्याविषयी मी एका साधिकेला सांगितले. तेव्हा ती साधिका म्हणाली, प.पू. बाबा योग्य तेच बोलले आहेत; कारण भरताने प्रभु श्रीरामाच्या पादुका डोक्यावरच ठेवल्या होत्या.
माझी पात्रता नसतांना प.पू. बाबांनी डोक्यावर पादुका ठेवायला सांगितल्या आणि तसे केल्यावर माझ्यात अनेक पालट झाले, उदा. आवश्यक तेवढेच बोलणे, हळू हसणे, सतत नामात रहाणे, हट्टीपणा न्यून होणे, मन शांत होणे आणि मायेतील विचारांचे प्रमाण न्यून होणे. हे सर्व प.पू. बाबांच्या कृपेमुळे झाले आहे. मी त्यांच्या चरणपादुका माझ्या डोक्यावर ठेवल्यामुळे माझ्यावर चैतन्याचा वर्षाव झाला. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– सौ. वैशाली मुदगल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.५.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |