महाराष्ट्र्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी हिंदु धर्माच्या तत्त्वाप्रमाणे जीवनपद्धती आचरण्यास सांगणे

पी.सी. अलेक्झांडर

‘पुणे विद्यापिठाच्या सभागृहात राजीव गांधी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या परिसंवादाला महाराष्ट्र्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर उपस्थित होते. ‘२१ व्या शतकातील भारतीय समाजाची रचना कोणत्या मूल्यांवर आधारित असावी ?’, असा मोठा गहन विषय परिसंवादासाठी निवडण्यात आला होता. राज्यपाल महोदयांनी ३ मूल्यांच्या आधारे आपला विषय मांडला. त्यातील पहिले सूत्र होते,

सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्‍चिद् दुःखमाप्नुयात् ॥

अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो.

दुसरे सूत्र ‘‘वसुधैव कुटुम्बकम्’’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) आणि तिसरे सूत्र म्हणजे ‘‘एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति’’ (‘ब्रह्म’ हे एकच सत्य नाम आहे आणि वेदज्ञ त्याला विविध नावांने ओळखतात)

या वेळी उपस्थित विद्वान मंडळींचे तोंडवळे पहाण्यासारखे झाले होते. ‘हिंदु धर्माच्या तत्त्वाप्रमाणे जीवनपद्धती आचरली, तर चिरंतन स्थैर्य मिळेल’, असाच संदेश राज्यपाल महोदयांच्या भाषणातून व्यक्त झाला.

(संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)