महाराष्ट्र एकीकरण समितीचे संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हुतात्मा झालेल्यांना अभिवादन

रहेंगे तो महाराष्ट्र मे; नही तो जेल मे !

बेळगाव –‘ रहेंगे तो महाराष्ट्र मे; नही तो जेल मे’, अशी घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेल्यांना १७ जानेवारी या दिवशी अभिवादन केले. कोरोनाचे कारण पुढे करत पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला फेरी काढण्यास मज्जाव केला. यामुळे कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर, महिला आघाडीच्या रेणू किल्लेदार, शुभम शेळके यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. या वेळी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या.