भाजप कार्यकर्ता हीच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची सुरक्षितता ! – खासदार गिरीश बापट

सातारा, १४ जानेवारी (वार्ता.) – राज्य सरकारने आकसाने सुरक्षा व्यवस्था पालटली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य सरकारच्या खास सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता नाही. भाजप कार्यकर्ता हीच त्यांची सुरक्षितता आहे, असे खासदार गिरीश बापट यांनी राज्य सरकारवर टीका करतांना सांगितले.

१० जानेवारी या दिवशी खासदार गिरीश बापट यांनी जलमंदीर पॅलेस येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बापट पुढे म्हणाले की, राज्य सरकारने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदार यांची सुरक्षा वाढवली आहे; मात्र दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदारांची सुरक्षा न्यून केली आहे. हे चुकीचे आहे.