लव्ह जिहादच्या प्रकरणात पसार असलेल्या धर्मांधांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश

असा आदेश लव्ह जिहाद प्रकरणी पसार असणार्‍याच नव्हे, तर अटक केलेल्या आरोपीचीही संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने द्यायला हवा, असेच हिंदूंना वाटेल !

सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु तरुणीचे अपहरण करून तिचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी गेल्या ४७ दिवसांपासून पसार असणार्‍या जिब्राईल याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही; मात्र न्यायालयाने त्याची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला आहे.

यात त्याचे घर आणि शेत यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याची रोख आणि अन्य संपत्ती यापूर्वीच जप्त केली होती, आता उर्वरित संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. जिब्राईल याला शोधण्यासाठी पोलीस उत्तरप्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड येथे धाडी टाकत आहेत; मात्र तो सापडत नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याची संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला.