विवाह बंधन
सुषमा आणि सुनील विवाह बंधनात अडकले ।
तरी गुरुप्राप्तीचे द्वार त्यांना सदैव उघडेच असे ॥
भाव आणि श्रद्धा जेथे ओथंबून आहे ।
अशी एक कन्या ‘सुषमा’ सनातनची आहे ॥
नाते तिचे जुळले असे ।
‘सुनील’ही एक गुरुसेवक असे ।
तळमळीने जो सेवा करत असे ॥
सुषमा आणि सुनील बंधनात अडकले ।
भाव अन् तळमळ यांचे हे बंध असे ।
गुरुप्राप्तीचे द्वार त्यांना सदैव उघडेच असे ॥
– सौ. अरुणा आणि श्री. अजित तावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२१)
सुकन्या सुषमा आणि सुपुत्र सुनील सनातनचा ।
सुषमा सुकन्या सनातनची ।
षड्विकारांचे निर्मूलन करून ।
मार्ग ईश्वरप्राप्तीचा चालतसे ती ॥ १ ॥
सुपुत्र सनातनचा सुनील ।
नीत्य प्रयत्नरत साधनेत ।
लगबग गुरुसेवेची सतत ॥ १ ॥
उभयतांवर रहावी गुरुकृपा निरंतर ।
आनंदमय व्हावा संसार ॥
हीच आमची श्रीगुरुचरणी प्रार्थना ॥
– श्री. रूपेश रेडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२१)
श्री. सुनील अणि सौ. सुषमा यांना विवाहानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा ।
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |