मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाने धर्मांतरास नकार दिल्यावर त्याच्यावर तरुणीच्या नातेवाइकांकडून आक्रमण

  • मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर केल्यावर या तरुणाची बाजू घेणारे आता खरे प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाच्या बाजूने का बोलत नाहीत ?
  • हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवणारे आता गप्प का ?
धर्मांधांच्या आक्रमणात जखमी झालेले अभिनंथ आणि त्याची आई लेखा

अलुवा(केरळ) – अभिनंथया २७ वर्षीय हिंदु तरुणानेमुसलमान तरुणीशी विवाह करून इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे अभिनंथ आणि त्याची आई लेखा यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केले. या घटनेत लेखा यांचा हात तुटला आणि अभिनंथच्या डोक्यावर लोखंडी सळीने वार केल्यानेते गंभीर घायाळ झाले. या दोघांनाही अलुवा येथील करोठुकुळी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अलुवा पोलिसांनी आरोपींवर गुन्हा नोंदवला असून या प्रकरणी तरुणीच्या बहिणीचा पती ऐजाज याला अटक केली आहे.

१. अभिनंथ आणि मुसलमान तरुणी यांनी ३ वर्षांपूर्वी लग्न केले होते आणि दीड वर्ष ते एकत्र रहात होते. याकाळात तिला तिच्या पतीपासून दूर नेण्याचे अनेक प्रयत्न झाले. तरुणी आता तिच्या पालकांच्या नियंत्रणात आहे; पण तरीही तिचा अभिनंथशी संपर्क कायम आहे. अभिनंथने हे स्पष्ट केले होते की, तो त्याचा धर्म पालटण्यास सिद्ध नाही आणि जर पत्नीला घटस्फोट हवा असेल, तर तिने त्याला थेट विचारून घ्यावे.

२. १८ डिसेंबर या दिवशी तरुणीच्या नातेवाइकांनी अभिनंथच्या घरात घुसून त्याला इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले किंवा घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करण्यास सांगितले.जेव्हा त्याने या  अटी मान्य करण्यास नकार दिला, तेव्हा तरुणीच्या ११ नातेवाइकांनी अभिनंथ आणि त्यांची आई यांच्यावर आक्रमण केले.