कळंबणी बु. (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री भैरी चाळकोबा मंदिरातील मूर्तीची तोडफोड आणि दानपेटीतील रकमेची चोरी

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
  • हिंदूंच्या धार्मिक स्थानांच्या संदर्भात अशा घटना सातत्याने घडणे, हे हिंदूबहुल भारतासाठी लाजिरवाणे !

खेड – तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील श्री भैरी चाळकोबा मंदिरातील मूर्तीची अज्ञाताकडून तोडफोड करण्यात आली आहे, तसेच दानपेटीतील रोख १ सहस्र रुपयांची चोरीही करण्यात आली आहे. ही घटना २४ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ ते २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ८.३० या वेळेत घडली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या पाठीमागील बाजूने छताची कौले काढली. श्री भैरी चाळकोबा देवाच्या मूर्तीशेजारी असलेल्या चाळकोबा सैनिक देवाची दगडी मूर्ती उचलून तिचा वापर दानपेटी फोडण्यासाठी केला. यामुळे मूर्तीचा चेहरा आणि खालचा भाग विद्रुप झाला आहे, तसेच देवाचे पितळी त्रिशूळही दोन भागांत तोडून दानपेटीतील १ सहस्र रुपये चोरले. अशा प्रकारची तक्रार श्री. अनंत बापू गुरव यांनी खेड पोलीस ठाण्यात केली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे आणि चोरी करणे या आरोपांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक अन्वेषण पोलीस करत आहेत.