पाकमध्ये बलात्काराच्या प्रतिदिन घडतात ११ घटना !

गेल्या ६ वर्षांत २२ सहस्र घटनांमध्ये केवळ ७७ जण दोषी

पाकसारखा इस्लामी देशही त्याच्या देशात बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी शरीयत न्यायालय स्थापन करून त्याद्वारे हातपाय तोडण्याची, भर चौकात बांधून दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देत नाही, यावरून त्यांचे शरीयत प्रेम किती ढोंगी आहे, हे लक्षात येते !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये प्रतिदिन बलात्काराच्या ११ घटना घडतात, तर गेल्या ६ वर्षांत देशात २२ सहस्रांहून अधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत; मात्र यातील केवळ ७७ प्रकरणांत आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. म्हणजे केवळ ०.३ टक्केच दोषींना शिक्षा मिळाली आहे. ही आकडेवारी सरकारी यंत्रणांनी दिलेली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था, सामाजिक दबाव आणि कायद्यांतील पळवाटा यांमुळे एकूण बलात्कारांच्या केवळ ४१ टक्के प्रकरणांतच पोलिसात तक्रार नोंदवली जाते. ही आकडेवारी समोर आल्यानंतर पाक सरकारने बलात्काराच्या घटनांवर तात्काळ सुनावणीसाठी विशेष न्यायालये स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.