अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी ३ युवकांना न्यायालयीन कोठडी

मालवण – एका अल्पवयीन मुलीवर खासगी लॉजमध्ये बलपूर्वक अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या ३ युवकांना जिल्हा विशेष न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली. त्यानंतर या तिघांची सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या २ गाड्या पोलिसांनी कह्यात घेतल्या आहेत.

एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर काही युवकांनी अत्याचार करून या  घटनेचा ‘व्हिडिओ’ बनवला. या प्रकरणी पोलिसांनी घेऊन १४ नोव्हेंबरला ३ संशयितांना कह्यात घेतले होते.

या घटनेत पिडित मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप संशयितांनी करून त्यांच्या विरोधात तक्रार नोंद केली होती. त्यानुसार पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.