शिर्डी येथील साईबाबा संस्थान न्यासाकडून ५१ कोटी रुपये

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी शासनाकडे निधी जमा

भ्रष्ट राजकीय नेते, नीरव मोदी, मल्ल्या आदी मंडळींनी जनतेचा लुबाडलेला पैसा आपत्काळात कामी येईल का ?

शिर्डी – येथील साईबाबा संस्थान न्यासाने कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी लागणार्‍या व्ययासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत ५१ कोटी रुपये दिले आहेत.  क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी ५० लाख रुपये दान दिले आहेत, तर सौरव गांगुली यांनी ५० लाख रुपयांचे तांदूळ दारिद्य्ररेषेखालील जनतेसाठी दिले आहेत.