तुम्ही दाविला मार्ग म्हणून भावमय झाले सर्व साधकजन ।

हिंदू राष्ट्र स्थापनेचे उच्च ध्येय ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
कु. मनश्री साने

गुढीपाडवा आहे आनंदाचा दिवस हिंदूसाठी ।
तसेच तुम्ही (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणणार आहात ।
हिंदु राष्ट्र-स्थापनेचा दिवस सर्व साधकांसाठी ॥ १ ॥

जसे श्रीरामाने केले प्रजेला मुक्त वालीपासून ।
तसेच तुम्ही करणार आहात साधकांना मुक्त ।
त्रास आणि वाईट शक्तींपासून ॥ २ ॥

श्रीराम आला, म्हणून भावातीत झाले सर्व भक्तजण ।
तसेच तुम्ही दाविला मार्ग म्हणून
भावमय झाले सर्व साधकजन ॥ ३ ॥

– कु. मनश्री साने, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०१८)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक