‘आध्यात्मिक ऊर्जा टिकवण्यासाठी नामजप करायला पाहिजे’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे अन् त्याप्रमाणे केल्यावर ‘आध्यात्मिक ऊर्जा मिळत आहे’, असे वाटून पुढील सेवा चांगली करता येणे

कु. मानसी अग्निहोत्री

‘सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी) एका साधिकेला विचारले, ‘‘तू थकलीस का ?’’ तेव्हा तिने ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यावर सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘आपण कधीच थकत नसतो. आपल्यात असलेली आध्यात्मिक ऊर्जा संपते; म्हणून आपण थकतो. ती आध्यात्मिक ऊर्जा टिकवण्यासाठी आपण उपाय आणि नामजप करायला पाहिजे. त्यामुळे ऊर्जा वाढून आपण अजून उत्साहाने सेवा करू शकतो. मी तसे केल्यावर ‘आध्यात्मिक ऊर्जा मिळत आहे’, असे मला वाटले आणि मला पुढील सेवा चांगली करता आली.’

– कु. मानसी अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.९.२०१९)