प्राणायाम करतांना कुंभक (बंध) लावणे अत्यावश्यक !

प्रतिकात्मक छायाचित्र

प्राणायाम करतांना बंध लावणे अपरिहार्य आहे. प्राणायाम करतांना जे कुंभक करावे लागते, त्यात मूलबंध (गुद्द्वार आकुंचन करणे), उड्डियान बंध (नाभीजवळील ओटीपोटाचा भाग आत खेचणे) आणि जालंधर बंध (हनुवटी गळ्याच्या खोबणीजवळ टेकवून जीभ वर उचलून टाळ्यास लावणे) हे तीन बंध येतात. हल्ली बरेचदा प्राणायामाची कृती सांगतांना याचा उल्लेख करत नाहीत. बंध न लावल्यास ती केवळ ‘क्रिया’ होते. बंध लावले तर तो ‘प्राणायाम’ होतो. (‘प्राणायामाने रोग बरे होतात; परंतु प्राणायाम करायला चुकला तर रोग निर्माण होतात’, अशा अर्थाचा संस्कृत श्लोक गोरक्षनाथकृत ‘हठयोगप्रदिपिका’ या ग्रंथात आहे. त्यामुळे ‘प्राणायाम मार्गदर्शकांकडून शिकायला आणि मार्गदर्शनाखाली करायला हवेत’,  असे सांगितले जाते.)

शुद्धीक्रिया (धौती, बस्ती, नेती, त्राटक, नौली आणि कपालभाती ही षट्कर्मे ) नित्यनेमाने करत राहिल्याने नाडीशुद्धी होते. त्यानंतर केलेल्या प्राणायामाचा लाभ अधिक होतो.