वांगे वातूळ असते का ?

वांगे मुळीच वातूळ नसते. वांगे हे वात आणि कफ यांच्यावर एक चांगले औषध आहे. छातीत कफ झालेला असल्यास वांग्याच्या ५ – ६ फोडी पाण्यात उकळून ते पाणी दिवसातून २ – ३ वेळा ४ – ५ दिवस प्यायल्यास कफ बरा होतो.

तूरडाळ खाल्ल्याने पित्त होते का ?

‘कुळीथ आणि उडीद सोडल्यास सर्व कडधान्यांच्या डाळी पित्त न्यून करणार्‍या आहेत. त्यामुळे ‘तूरडाळीने पित्त होते’, हा निवळ अपसमज आहे !

उभ्याने पाणी प्यायल्याने खरेच गुडघेदुखी होते का ?

याला काही शास्त्रीय आधार नाही – ‘उभ्याने पाणी पिणे चुकीचे आहे’, असे म्हणता येत नाही. त्यामुळे उभ्याने पाणी प्यायले, तरी चालू शकते; मात्र बसून किंवा उभे राहून कोणत्याही पद्धतीने पाणी पितांना ते गटागट न पिता शांतपणे प्यावे.’

शरद ऋतूमध्ये येणार्‍या तापामध्ये कोणता आहार घ्यावा ?

‘पावसाळा संपून थंडी चालू होईपर्यंतच्या काळाला शरद ऋतू म्हणतात. या ऋतूच्या आरंभीच्या काळामध्ये तापाची साथ येण्याची शक्यता असते. ताप आलेला असतांना दिवसातून २ वेळाच आहार घ्यावा. आहारामध्ये वरण, भात, तूप आणि आवश्यकता वाटल्यास चवीसाठी थोडेसे लोणचे घ्यावे.

शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी हे करा !

‘पावसाळा संपून थंडीचे दिवस चालू होईपर्यंत शरद ऋतू असतो. सध्या शरद ऋतू चालू आहे. या काळात निरोगी रहाण्यासाठी या कृती करा.

गृहिणींनो, दुपारच्या जेवणामध्ये विविधता आणा !

घरच्यांना २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय लावायची असेल, तर दुपारच्या जेवणात विविधता आणावी. गृहिणींनी नेहमी नवीन शिकण्याची सवय ठेवल्यास हे सहज शक्य आहे.’

साधकांनो, नेहमीच्या विकारांवर प्राथमिक उपचार म्हणून सनातनची आयुर्वेदाची औषधे वापरून पहा !

काही वेळा वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध घेतल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. सनातनची आयुर्वेदाची औषधे ही नेहमीच्या विकारांमध्ये प्राथमिक उपचार म्हणून वापरण्यासाठी आहेत.

कोणताही आवडीचा पदार्थ अवेळी न खाता जेवणाच्या वेळीच खा !

‘आयुर्वेदाला चटपटीत आणि चवदार पदार्थांचे वावडे आहे का ? मुळीच नाही. उलट रुची घेऊन जेवल्याने समाधान मिळते. त्यामुळे पदार्थांच्या चवींमध्ये विविधता हवीच; परंतु एखादा पदार्थ कितीही आवडणारा असला, तरी तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाण्याला पुष्कळ महत्त्व आहे !

रात्रीच्या जागरणाचा त्रास होऊ नये, यासाठी हे करा !

रात्रीचे जेवण लवकर झाल्याने जागरण झाल्यावर भूक लागते. अशा वेळी शेव, चिवडा यांसारखे फराळाचे पदार्थ खाऊ नका. जागरण होते तेव्हा पोटामध्ये पित्त वाढलेले असते. अशा वेळी फराळाचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पित्ताचा भडका उडेल….