ज्याला चूल पेटवता येते, त्याला निरोगी रहाण्याचे मर्म समजते !

भूक वाढू लागल्यावर टप्प्याटप्प्याने आहाराचे प्रमाण वाढवल्यास किंवा जड पदार्थांचा आहारात समावेश केल्यास दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या मध्ये काही खाण्याची आवश्यकता रहात नाही. यामुळे स्वतःच्या पचनशक्तीचे अनुमान घेऊन आहाराचे प्रमाण आणि पदार्थ ठरवणे आवश्यक आहे.

‘अन्न ग्रहण करणे’ ही साक्षात् अग्निनारायणाची उपासना आहे’, असा भाव ठेवा !

निरोगी जीवनासाठी जठरातील (पोटातील) अग्निनारायणाची कृपा असावी लागते. ती होण्यासाठी ‘अन्न ग्रहण करणे’ ही साक्षात् अग्निनारायणाची उपासना आहे’, असा भाव ठेवा.

‘भूक सहन करता येणे’ हे आरोग्याचे एक लक्षण !

भूक सहन होत नाही. खाण्याची वेळ झाली की, खावेच लागते; हे शारीरिक क्षमता न्यून असल्याचे लक्षण आहे. भूक सहन होण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी हळूहळू आहाराच्या एकूण वेळा न्यून करून केवळ २ वेळा आहार घेण्याची सवय लावायला हवी.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘सनातन त्रिफळा चूर्ण’

‘प्रतिदिन रात्री झोपतांना त्रिफळा चूर्ण मध-तुपासह घेतल्याने डोळ्यांची शक्ती वाढते’, असे ‘अष्टांगहृदय’ या आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे.’

लहान मुलांना चॉकलेट किंवा चिप्स देऊ नका ! त्याऐवजी सुकामेवा द्या !

एखादी काजूबी चॉकलेटपेक्षाही स्वस्त पडते. तरीही काजू, बदाम इत्यादी महाग वाटत असतील, तर मुलांना भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, तीळगूळ इत्यादी पदार्थ द्या; परंतु चॉकलेट आणि चिप्स देऊन मुलांचे आरोग्य बिघडवू नका !

सर्व प्रकारच्या खोकल्यावर ‘सनातन चंद्रामृत रस (गोळ्या)’

‘कोणत्याही प्रकारच्या खोकल्यावर प्राथमिक उपचार म्हणून ‘सनातन चंद्रामृत रस’ या औषधाच्या १ – २ गोळ्या खोकला येईल, तेव्हा चघळाव्यात. दिवसभरात ८ ते १० गोळ्या चघळल्या, तरी चालतात.

तापानंतरच्या थकव्यावर ‘सनातन लघुमालिनी वसंत’

ताप येऊन गेल्यावर थकवा येतो. हा थकवा जाण्यासाठी १५ दिवस प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी ‘सनातन लघुमालिनी वसंत’ची १ गोळी बारीक पूड करून २ (चहाचे) चमचे तुपात मिसळून खावी. वर वाटीभर गरम पाणी किंवा गरम दूध प्यावे.

केवळ २ वेळा आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना निरुत्साही करू नका, तर प्रोत्साहन द्या !

आपण शरिराला जशी सवय करू, तशी सवय लागते. एखाद्याला २ वेळा आहार घेणे जमत असेल, तर रात्री ८ ते दुपारी १२ पर्यंत काही न खाल्ल्याने त्याचे पित्त वाढत नाही. उलट एवढा वेळ उपवास घडल्याने अन्नाचे पूर्ण पचन होते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

दिवाळीचा फराळ विकत घेण्यापेक्षा घरी बनवा !

‘वनस्पती तूप’ आरोग्याला हानीकारक असते. पेठेतील फराळाचे पदार्थ बहुधा वनस्पती तुपात केलेले असतात. त्यामुळे दिवाळीचा फराळ विकत न आणता शक्यतो घरीच बनवा. तूप परवडत नसेल, तर तेल वापरा; पण वनस्पती तुपाचा वापर टाळा !

‘जेवण पचत नाही’, असे सांगून सोडून देऊ नका, तर उत्तम पचनशक्ती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करा !

‘पोळी पचत नाही. वांगे खात नाही. टॉमेटो चालत नाही. कोबी आवडत नाही. कडधान्य घशातून खाली उतरत नाही’, इत्यादी किती दिवस म्हणत रहाणार ?