साधकांना सूचना
‘साधकांशी बोलल्यावर असे लक्षात आले की, अनेक साधकांनी सनातनची आयुर्वेदाची औषधे घरी घेऊन ठेवली आहेत; परंतु ती वापरूनच पाहिली नाहीत. काहींच्या बोलण्यातून समजले की, दैनंदिन तक्रारींसाठी सनातनची आयुर्वेदाची औषधे घरी उपलब्ध असतांनासुद्धा ‘ती औषधे आपल्याकडे आहेत’, याचा विसर पडल्याने साधक पेठेतून नवीन औषधे विकत घेतात.
काही वेळा वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध घेतल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. सनातनची आयुर्वेदाची औषधे ही नेहमीच्या विकारांमध्ये प्राथमिक उपचार म्हणून वापरण्यासाठी आहेत. ती केवळ घेऊन ठेवून देऊ नका, तर त्यांचा वापर करून पहा.
आतापर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सनातनच्या आयुर्वेदाच्या औषधांविषयी प्रसिद्ध झालेली माहिती पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे. ही मार्गिका साधकांनी स्वतःकडे संरक्षित (सेव्ह) करून ठेवावी आणि औषधे वापरून पहावीत. येथून पुढे औषधांविषयी प्रसिद्ध झालेली माहितीही याच मार्गिकेवर एकत्रित उपलब्ध होईल. ही मार्गिका उघडण्यासाठी भ्रमणभाषवर ‘गूगल डॉक’ ही प्रणाली (ॲप) असणे आवश्यक आहे. ती नसल्यास घालून घ्यावी. (डाऊनलोड करून घ्यावी.)’
सनातनच्या आयुर्वेदाच्या औषधांच्या माहितीसाठी मार्गिका – bit.ly/3LVvHHo (या मार्गिकेतील काही अक्षरे ‘कॅपिटल’ आहेत, याची वाचकांनी नोंद घ्यावी.)
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.९.२०२२)