रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण इत्यादी खात असाल, तर सावधान !

नेहमी रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण, बाकरवडी, शेव, चिवडा यांसारखा फराळ चालू आहे’, असे असूनही जर तुम्ही निरोगी असाल, तर ती तुमची पूर्वपुण्याईच ! परंतु ही पूर्वपुण्याई संपली की, चुकीच्या सवयींचे परिणाम रोगाच्या रूपाने दिसू लागतील !

केवळ २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवण्यासाठी हे करा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : एकदा जेवतो तो योगी. दोन वेळा जेवतो तो भोगी. तीन आणि त्याहून जास्त वेळा जेवतो तो रोगी !

तूप हे अमृतासमान असल्याने ते घरी ठेवाच !

अनेकांना वाटते की, तूप महाग असते. आपल्याला परवडणार नाही; परंतु ‘तूप महाग असले, तरी शरिरासाठी अत्यावश्यक आहे’, हे लक्षात घ्यायला हवे. आरोग्याच्या दृष्टीने अनावश्यक पदार्थांवर होणारा (अप)व्यय वाचवून तो व्यय (खर्च) तुपावर करा.

शरीर निरोगी राखण्यासाठी केवळ एवढेच करा !

‘केवळ ‘प्रतिदिन नेमाने व्यायाम करणे’ आणि ‘दिवसातून २ वेळाच आहार घेणे’, या दोनच गोष्टी नित्य आचरणात ठेवल्या, तर शरीर निरोगी रहाते. दुसरे काहीही करण्याची आवश्यकता रहात नाही, एवढे या २ कृतींना महत्त्व आहे !’

प्रतिदिन सायंकाळी चहा-फराळ करणे आवश्यक नसल्याने ते सोडा !

‘अनेक जण सायंकाळच्या वेळेत चहा आणि फराळ करतात. फराळामध्ये शेव, चिवडा, फरसाण यांसारखे तळलेले पदार्थ खातात. खरेतर या सायंकाळच्या चहा-फराळाची शरिराला थोडीसुद्धा आवश्यकता नसते, तरीही बहुतेक जण केवळ घरी हे पदार्थ आणून ठेवलेले किंवा उपलब्ध आहेत म्हणून खातात.

साधकांनो, शरिराची हेळसांड करू नका !

‘मला आतापर्यंत काहीही झालेले नाही’, असे म्हणून चुकीच्या सवयी तशाच चालू ठेवत असाल, तर थांबा ! विचार करा ! ईश्वरप्राप्ती हे आपले ध्येय आहे. हा दूरचा प्रवास आहे. त्यामुळे त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या शरिराची काळजी घ्या !’

साधना चांगली होण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करण्याची आवश्यकता

ईश्वरप्राप्तीच्या वाटेवर मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक साधकाने ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘शरीर असेल, तरच धर्म किंवा साधना करणे शक्य होते’, हे सूत्र लक्षात ठेवायला हवे. साधनेसाठी शरीर निरोगी हवे. यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करायला हवे.

सुंठ घालून उकळलेले पाणी आंबूस झाल्यास वापरू नका !

काही वेळा एका दिवसानंतर हे पाणी आंबूस होते. असे झाल्यास हे पाणी वापरू नये. शक्यतो आपल्याला आवश्यक तेवढेच पाणी उकळून त्या त्या दिवशी ताजे वापरावे.

सनातन उशीर (वाळा) चूर्णाचे औषधी उपयोग

येथे दिलेली माहिती आणि पत्रकातील माहिती यांमध्ये भेद असू शकतो. दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारे औषधाचा वापर केला तरी चालतो.

तिखट खात नसूनसुद्धा काही जणांना पित्ताचा त्रास का होतो ?

बहुतेक वेळा यामागे बद्धकोष्ठता हे कारण असते. बद्धकोष्ठता दूर होण्यासाठी उपचार केल्यास हा त्रास लगेच न्यून होतो. पुढील प्राथमिक उपचार करून पहावेत. औषधे वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावीत.