निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ७२
‘कुळीथ आणि उडीद सोडल्यास सर्व कडधान्यांच्या डाळी पित्त न्यून करणार्या आहेत. त्यामुळे ‘तूरडाळीने पित्त होते’, हा निवळ अपसमज आहे. तूरडाळीची आमटी करतांना त्यामध्ये अधिक प्रमाणात आंबट किंवा तिखट घातले असेल, तर त्याने मात्र पित्त होते. यामध्ये दोष तूरडाळीचा नसून आंबट आणि तिखट यांचा असतो.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)