अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संयुक्त सैनिकी सराव रोखा !

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात १३ मार्चपासून चालू झालेला संयुक्त सैनिकी सराव रोखावा, अशी मागणीउत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांनी संयुक्त राष्ट्रांकडे केली.

चांगले किंवा वाईट आतंकवादी असा भेद करणे चुकीचे !

आतंकवादाच्या सर्व प्रकारांचा निषेध केला पाहिजे. आतंकवादाच्या कोणत्याही कृत्याचे समर्थन होऊच शकत नाही. पाकिस्तानकडे बोट दाखवत कंबोज म्हणाल्या की, आतंकवाद्यांना आश्रय देणारे देश ओळखले पाहिजेत. त्यांना त्यांच्या कृतीसाठी उत्तरदायी धरले पाहिजे.

तुर्कीयेची शेपूट वाकडीच !

‘भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे’, असा आरोप संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये तुर्कीयने पाक आणि इस्लामी देशांच्या संघटना यांच्या बरोबरीने केला. त्याला भारताने सडतोड उत्तर दिले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये तुर्कीयेने काश्मीरप्रश्‍नी पाकची ‘री’ ओढली !

याला म्हणतात कुत्र्याची शेपटी किती सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती वाकडीच रहाते ! भारताने भूकंपाच्या काळात तुर्कीयेला साहाय्य करूनही तो अजूनही पाकच्याच नादी लागलेला आहे, हे स्पष्ट होते !

(म्हणे) शेजारील देशाला होत असलेल्या शस्त्रपुरठ्यामुळे दक्षिण आशियात अस्थिरता ! – पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार

गेली अनेक दशके अमेरिकेकडून पाकला होत असलेल्या शस्त्रपुरवठ्यामुळे ही अस्थिरता निर्माण होत नव्हती का ?

जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ भारताच्या दौर्‍यावर !

जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ २ दिवसांच्या भारत दौर्‍यावर राजधानी देहलीमध्ये पोचले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही चान्सलर स्कोल्झ भेट घेणार आहेत.

पाकिस्तानच आतंकवाद्यांचा सुरक्षित आश्रयदाता ! – भारताचे संयुक्त राष्ट्रांत खडे बोल

वारंवार अशी दिशाहीन सूत्रे मांडून महासभेचा अमूल्य वेळ घेत असल्याविषयी पाकला सभेतून बहिष्कृत करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांवर दबाव आणला पाहिजे !

उत्तर कोरियाने केले आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे परीक्षण

यामागे शत्रूच्या शक्तीसमोर आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करणे, हाच हेतू होता, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे.

अफगाणिस्तान आतंकवादाचे मुख्य केंद्र ! – संयुक्त राष्ट्रे

अफगाणिस्तान हे मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आतंकवादाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या परिसरात अशांती असणार आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केला आहे.

समुद्राची पातळी वाढू लागल्याने मुंबईसह न्यूयॉर्क, लंडन आदी शहरांना मोठा धोका !

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची चेतावणी !