गाझा लहान मुलांसाठी कब्रस्तान बनत आहे ! – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस

न्यूयॉर्क (अमेरिका) – गाझातील युद्ध हे केवळ माणसांवरील संकट नाही, तर त्यापेक्षाही अधिक मोठे आहे. गाझा लहान मुलांसाठी कब्रस्तान बनत आहे. हे मानवतेवरील संकट आहे. या युद्धाच्या प्रत्येक घंट्यानंतर युद्धविरामाची आवश्यकता वाढत असून तातडीने युद्धविराम केला पाहिजे, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या पथकातील ८९ जणांचा मृत्यू

गेल्या एक महिन्यापासून चालू असलेल्या हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धात पॅलेस्टाईनमध्ये साहाय्य आणि पुनर्वसन यांचे काम करणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या पथकातील ८९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही गुटेरस यांनी दिली.

संपादकीय भूमिका

याला उत्तरदायी असणार्‍या हमासच्या विरोधात संयुक्त राष्ट्रे काय कारवाई करणार ?, हे गुटेरस यांनी सांगितले पाहिजे !