धार्मिक स्थळांवरील आक्रमणे रोखा ! – भारताने कॅनडाला सुनावले

भारताच्या स्थायी समितीचे सचिव के.एस्. महंमद हुसेन

जिनिव्हा – धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांवरील आक्रमणे रोखा, अशा शब्दांत भारताने कॅनडाला ठणकावलेे. भारताच्या स्थायी समितीचे सचिव के.एस्. महंमद हुसेन यांनी गेल्या आठवड्यात जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र  मानवाधिकार परिषदेच्या आढावा बैठकीत कॅनडाला चांगलेच सुनावले. हुसेन त्यांच्या भाषणात म्हणाले की, ‘मानवी तस्करी रोखण्यासाठी कॅनडाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय अहवाल सादर केल्याविषयी भारत त्याचे स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो.

भारताने कॅनडाला सांगितले की,

१. हिंसाचार भडकवण्यासाठी कारणीभूत असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर रोखा. त्यासाठी देशांतर्गत चौकट अधिक मजबूत करून आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणार्‍या गटांच्या कृत्यांना पाठिंबा देऊ नका.

२. धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांच्या उपासना ठिकाणांवरील आक्रमणे आणि द्वेषयुक्त भाषणबाजी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा.