(म्हणे) ‘जनता प्रत्युत्तर देणार !’- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी

देहलीतील आंदोलन देशातील ८० कोटी शेतकर्‍यांचे आहे. मात्र केंद्र सरकार हे आंदोलन मूठभर शेतकर्‍यांचे आणि दलालांचे असल्याचे सांगत आहे

शरद पवारांच्या निकटवर्तीयाला वाचवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली !

अधिवक्ता आणि पत्रकार नानासाहेब जाधव यांचा जनहित याचिकेद्वारे आरोप

अभिनेता सचिन जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक

ओमकार ग्रुप प्र्रमोटर्स आणि सचिन जोशी यांच्यामध्ये झालेल्या १०० कोटी रुपयांच्या एका आर्थिक व्यवहारात अपहार झाल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

अखिल भारतीय जैन श्‍वेतांबर गुजराती समाज महासंघाचे केत-कावळे (जिल्हा नगर) येथे २ दिवसांचे अधिवेशन !

जैन श्‍वेतांबर गुजराती समाजाची राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेली संस्था अखिल भारतीय जैन श्‍वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या राज्य कार्यकारिणी समिती सदस्यांचे प्रथमच २ दिवसांचे राष्ट्रीय महाअधिवेशन सेजल वर्ल्ड, केत-कावळे येथे नुकतेच झाले.

पुण्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात एकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

नवनाथ थोरात यांच्या विरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे; मात्र हा गुन्हा खोटा असल्याचे नवनाथ यांचे म्हणणे होते. याची माहिती देण्यासाठी ते ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात १३ फेब्रुवारीच्या सायंकाळी आले.

पूजा चव्हाण हिची हत्या नव्हे, तर आत्महत्याच ! – धनंजय मुंडे

ज्यांच्यावर आरोप झाले त्या सर्व परिस्थितीविषयी पोलीस अन्वेषण पूर्ण होऊ द्या. नंतर कोणाचे नाव येईल ते पाहू. तरीही ही हत्या नव्हे, तर आत्महत्या आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

विरोधी पक्ष करत असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव पुढे आले आहे. पत्रकारांनी ‘संजय राठोड कुठे आहेत ?’ असा प्रश्‍न विचारला असता ‘ते कुठे आहेत, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे’, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा ! – बंजारा समाज

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर

दौर्‍यात ज्या समित्यांना महेश जाधव यांना भेटायचे असेल, त्यांनी ९४२१२३८२०५, ७७२०९३४३०५ या क्रमांकांवर संपर्क करावा

कणकवलीत भाजपच्या १९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद, तर कुडाळमध्ये १० कार्यकर्ते पोलीस ठाण्यात उपस्थित

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पुतळा दहन केल्याचे प्रकरण