पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिरात १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमांसह सुंदर सजावट !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमांसह शेवंती आणि बेल पत्रांची सुंदर सजावट करण्यात आली होती. श्री. अनंत कटप या भाविकाच्या वतीने ही सजावट करण्यात आली होती.