राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान

डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापित होणार्‍या सर्व ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

शिर्डी येथे पदयात्रींनी पालख्या आणू नयेत ! – श्री साई संस्थानचे आवाहन

प्रतीवर्षी नियमित पालखी घेऊन येणार्‍या पदयात्रींनी यावर्षी पालखी आणू नये, असे आवाहन शिर्डी संस्थाननी केले.

ऊस वाहतूकदार टोळी मुकादमांवर गुन्हे नोंद करा ! – आमदार प्रकाश आबिटकर

मराठवाडा आणि विदर्भातील ऊस मजूर मुकादम यांच्याकडून जिल्ह्यातील ऊस वाहतुकदार मालकांची प्रतिवर्षी लाखो रुपयांची फसवणूक  होते. त्यामुळे या टोळी मुकादमांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली.

मुंबईत ‘नाइट क्लब’च्या मालकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास संचारबंदी ! -इक्बालसिंह चहल, आयुक्त, महापालिका

मौजमजा करण्याच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात नियम न पाळता एकत्रित आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल.

शहापूर येथे १३ डिसेंबर या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन

शहापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि डी. वाय. फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वाहतुकीचा नियम चौथ्यांदा मोडल्यास ६ मासांसाठी अनुज्ञप्ती रहित होणार !

वाहतूक विभागाकडून ‘वाहनचालकांनी नियमांचे पालन कटाक्षाने करावे. रस्त्यावर पोलीस नाहीत, हे पाहून नियम मोडण्याचे धाडस करू नये’, असे आवाहन केले आहे.

प्रभाग क्रमांक १६ मधील रेवणी रस्त्यावरील फायर स्टेशनच्या जागेवरच नवीन अत्याधुनिक फायर स्टेशन बांधा !

फायर स्टेशन आयुक्तांच्या आदेशाने स्टेशन चौक येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. या जागेवर प्रशासन काय करणार आहे ?

बेळगाव जिल्ह्यात ४७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार

बेळगाव जिल्ह्यात ४७७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५९ ग्रामपंचायतींची, तसेच दुसर्‍या टप्प्यात २१८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.

साहित्य संस्थांच्या अनुदानाला कोरोनाचा विळखा !

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साहित्य संस्थांना शासनाकडून देण्यात येणारे अनुदान कमी करण्यात आले आहे. अनुदानाच्या तुटपुंज्या रकमेवर साहित्य संस्था कशा चालवायच्या ?, असा प्रश्‍न संस्थाचालकांनी उपस्थित केला आहे.

सातारा येथील राजवाडा बसस्थानकात साकारण्यात आलेले ‘शिव-समर्थ शिल्प’ कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येऊ नये !

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु राष्ट्रसंत श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. काही समाजविघातक शक्तींकडून हे शिल्प हटवण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.