अध्यात्मात शिकवणे नाही, तर शिकणे महत्त्वाचे असणे !

‘अध्यात्म हे अनंताचे ज्ञान आहे. त्यामुळे अध्यात्मात शिकवणे नाही, तर शिकणे महत्त्वाचे आहे. आपल्याला ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे आणि तो सर्वज्ञानी आहे. यासाठी आपण नेहमी शिकण्याच्या स्थितीत राहून ते ज्ञान आत्मसात केले पाहिजे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पोलीस खात्यातील भ्रष्टाचार

‘स्वतःच्या खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस न आणणारे पोलीस समाजातील भ्रष्टाचार उघडकीस आणतील का ?’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

देवतेची उपासना करण्यापूर्वी तिची गुणवैशिष्ट्ये जाणून घ्या !

एखाद्या देवतेची उपासना करण्यापूर्वी त्या देवतेची गुणवैशिष्ट्ये जाणून घेतल्यास उपासना करतांना त्यानुरूप आपल्या प्रार्थना अन् कृतज्ञता होतात आणि त्यामध्ये त्या प्रमाणामध्ये भाव येतो.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

देवतेच्या व्यापक रूपाची उपासना कठीण असल्यामुळे तिच्या प्रचलित रूपाचीच उपासना करावी !

देवतांच्या व्यापक स्तरावरील रूपाची उपासना करणे कठीण जाते. यासाठी देवतांची उपासना करतांना त्यांच्या प्रचलित सगुण रूपाची उपासना करावी. त्या वेळी संबंधित देवता जवळची वाटते अन् त्यातून भावजागृतीही लगेच होते.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

अनुभूतीवरून नामजप तारक आहे कि मारक, हे ओळखावे !

‘नामजप हे तारक आणि मारक अशा दोन पद्धतींचे असतात. नामजप ऐकतांना भावजागृती होऊ लागल्यास तो तारक पद्धतीचा असतो आणि शक्ती जाणवू लागल्यास तो मारक पद्धतीचा असतो.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

संतांचा मनोलय

‘संतांचा मनोलय झालेला असल्यामुळे त्यांना कधीच मनोविकार होत नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

साधकांना मायेच्या गोत्यात गुंतवणारे नातेवाईक !

‘साधना करणारा युवक मायेतील सर्व गोष्टींचा त्याग करण्याचा प्रयत्न करत असतो. लग्न लावून दिल्यावर नातेवाइक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ते त्याला साधनेसाठी किंवा संसारासाठी साहाय्य करत नाहीत. त्यामुळे तो युवक संसाराच्या अडीअडचणींमुळे साधनेपासून दूर जातो आणि मायेत पूर्णपणे अडकतो.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

चैत्र शुक्ल प्रतिपदेला नववर्ष साजरे करण्यामागे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत !  – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गुढीपाडवा’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !

‘राम आणि कृष्ण यांच्या युगात गांधीवादी असते, तर . . .

‘राम आणि कृष्ण यांच्या युगात गांधीवादी असते, तर त्यांनी राम-कृष्ण यांनाही अहिंसावाद शिकवण्याचा प्रयत्न केला असता आणि रावण अन् कंस यांना जिवंत ठेवले असते. त्यामुळे हिंदू नष्टच झाले असते.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

भक्ताला अहंभाव नसणे

‘मी साधना करतो’, असा भक्ताला अहंभाव नसतो; कारण ‘त्याच्याकडून सर्व काही, म्हणजे साधनाही देवच करवून घेतो’, हे त्याला ज्ञात असते.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले