परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन
‘एखाद्या व्यक्तीशी बोलण्यापूर्वी तिची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, ती इतरांना कशा प्रकारे साहाय्य करते, हे आपल्याला कळले की, आपल्याला तिच्याबद्दल आपुलकी वाटून तिच्याशी सहज बोलणे होते. त्या व्यक्तीबाबत काहीच ठाऊक नसल्यास त्या बोलण्यात आपलेपणा नसतो. हाच भाग देवतांची उपासना करतांनाही होतो. एखाद्या देवतेची उपासना करण्यापूर्वी त्या देवतेची गुणवैशिष्ट्ये जाणून घेतल्यास उपासना करतांना त्यानुरूप आपल्या प्रार्थना अन् कृतज्ञता होतात आणि त्यामध्ये त्या प्रमाणामध्ये भाव येतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.३.२०२२)