देवतेच्या व्यापक रूपाची उपासना कठीण असल्यामुळे तिच्या प्रचलित रूपाचीच उपासना करावी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘एखाद्या देवतेचे विश्वव्यापी, सहस्रमुख, सहस्रहस्त यांसारखे व्यापक रूपाचे वर्णन वाचले की, तिच्या अशा रूपाची उपासना करावी, असे काही जणांना वाटते; परंतु यामध्ये लक्षात घेतले पाहिजे की, या रूपाची कल्पना करणे शक्य होत नाही. कल्पना केली, तरी त्या रूपाची शक्ती सहन करता येत नाही. त्यामुळे देवतांच्या अशा व्यापक स्तरावरील रूपाची उपासना करणे कठीण जाते. यासाठी देवतांची उपासना करतांना त्यांच्या प्रचलित सगुण रूपाची उपासना करावी. त्या वेळी संबंधित देवता जवळची वाटते अन् त्यातून भावजागृतीही लगेच होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.३.२०२२)