कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्या ! – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे

बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

कार्तिकी यात्रेच्या निमित्त पंढरपूर शहरात वाहतूक मार्गात पालट !

अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर मोहोळकडून येणारी सर्व वाहने करकंब क्रॉस रोड (अहिल्यादेवी चौक) तीन रस्ता मार्गे विसावा येथे थांबतील. ६५ एकर येथे केवळ दिंडी आणि पालखी यांची वाहने थांबतील.

अकलूज (सोलापूर) येथे गोवंशीय जनावरांचे ५५ किलो मांस आणि १९ जर्सी गोवंशीय जनावरे जप्त !

अकलूज येथील होनमाने प्लॉट येथे जनावरांची कत्तल झालेली आहे, अशी बातमी २२ ऑक्टोबर या दिवशी गोरक्षकांना मिळाली. तेथे गेले असता त्यांना ४-५ जण सौदागर कुरेशी यांच्या बंद घराजवळ उघड्यावर जर्सी जनावरे कापत होते.

कार्तिकी वारीत संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून नियोजन करावे ! – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी

कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी, भाविक यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी समन्वय साधून योग्य नियोजन करावे, अशा सूचना सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता !

१७ ऑक्टोबर म्हणजे आश्विन पौर्णिमेला रात्री छबिना मिरवणूक पार पडली. यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी जोगवा मागितला आणि त्यानंतर १५ दिवस चालू असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना अटक आणि जामिनावर सुटका !

धनादेश न वटल्याच्या प्रकरणात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना अटक करण्यात आली. जामीन संमत होऊन त्यांची त्वरित सुटका झाली. ७ नोव्हेंबरला पुढील सुनावणी आहे.

सोलापूर येथे तक्रारींसाठी प्रादेशिक परिवहन विभागाचा स्वतंत्र ‘टोल फ्री’ क्रमांक !

जर सोलापूर येथील प्रादेशिक परिवहन विभाग अशा प्रकारे तक्रारी नोंदवण्यासाठी क्रमांक घोषित करते, तर राज्यातील अन्य प्रादेशिक परिवहन विभागांच्या वतीनेही असे क्रमांक घोषित होणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रवाशांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये तक्रारी करणे शक्य होईल !

सोलापूर येथे धर्मप्रेमींनी प्रबोधनाद्वारे देवतांचे विडंबन रोखले !

देवतांचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मप्रेमींचे अभिनंदन !

शाळा, महाविद्यालये येथे ‘कुराण मार्गदर्शन’ या बेकायदेशीर मोहिमेला अनुमती देऊ नये !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी

सोलापूर येथील शाळा आणि महाविद्यालये येथे मुसलमानांकडून इस्लामच्या प्रचारासाठी राबवली जात आहे धडक मोहीम !

‘गीता शाळेत शिकवणार’, असे म्हटल्यावर शिक्षणाचे भगवेकरण झाल्याची आरोळी ठोकणारे निधर्मी आणि साम्यवादी आता कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत ? एकाही प्रसारमाध्यमातून या शिक्षणाच्या हिरवेकरणाचे वृत्त दिले जात नाही, हे लक्षात घ्या !