शिक्षणक्षेत्रात क्रांती हवी !

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले तरुण शिक्षक रणजितसिंह डिसले यांना प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर अवॉर्ड’ मिळाला आहे.

कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच माणगाव हायस्कूल चालू केल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचे आरोग्य धोक्यात 

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा कोरोनाशी संबंधित अहवाल येण्यापूर्वीच मुख्याध्यापक आणि संस्था प्रशासन यांनी माणगाव हायस्कूल चालू केले.

कोरोनाच्या सावटाखाली पुणे जिल्ह्यात पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून अल्प प्रतिसाद

राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा चालू केल्या आहेत. दोन दिवसांत एकूण ३६६ शाळा चालू झाल्या आहेत. २३ नोव्हेंबर या दिवशी ९ सहस्र ४३५ विद्यार्थी उपस्थित होते, तर २४ नोव्हेंबर या दिवशी ३ सहस्र १५९ विद्यार्थी उपस्थित होते.

कोरोनाची चाचणी न करताच शाळेत उपस्थित झालेले शिक्षक कोरोनाबाधित आढळले

सरकारच्या निर्देशांनुसार कोरोनाविषयक नियमांचे पालन करून २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळा चालू करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचणी करून शिक्षकांना उपस्थित रहाण्याचे आदेश आहेत; परंतु चाचणी न करताच येथील एका नामांकित माध्यमिक शिक्षण संस्थेत एक शिक्षक २३ नोव्हेंबर या दिवशी शाळेत उपस्थित झाले.

इंदापूर तालुक्यामधील (जिल्हा पुणे) इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या ३३ शाळा चालू

इंदापूर तालुक्यात १०४ शाळा असून त्यात १८ सहस्र ६१० विद्यार्थी आहेत. त्यातील ३३ शाळा पहिल्या दिवशी चालू झाल्या आणि त्यामध्ये १ सहस्र ३८८ विद्यार्थी उपस्थित होते.

फ्रान्समधील ‘त्या’ शाळेला ‘सर्वांना ठार करू’ अशी धर्मांधांकडून धमकी

धार्मिक भावना दुखावल्यावर असहिष्णु धर्मांध कायदा हातात घेतात, तर सहिष्णु हिंदू साधा निषेधही नोंदवत नाहीत !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे शहरातील सर्व शाळा तूर्तास बंद

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद .

७ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षकांची कोरोना पडताळणी पूर्ण करून टप्प्याटप्प्याने शाळा चालू करण्याचा निर्णय ! – जिल्हाधिकारी दौलत देसाई

२३ नोव्हेंबरपासून शाळा चालू करणे बंधनकारक नाही.

महानगरपालिका शाळांमधील गळती ?

महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या भौगोलिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे; पण तेथील शाळांची संख्या दिवसेंदिवस न्यून होत चालली आहे, हे दुर्दैवी आहे. परभणी महापालिकेमध्ये मराठी माध्यमाच्या केवळ २ शाळाच शेष आहेत.