५९ शिक्षक कोरोनाबाधित
पुणे – राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा चालू केल्या आहेत. दोन दिवसांत एकूण ३६६ शाळा चालू झाल्या आहेत. २३ नोव्हेंबर या दिवशी ९ सहस्र ४३५ विद्यार्थी उपस्थित होते, तर २४ नोव्हेंबर या दिवशी ३ सहस्र १५९ विद्यार्थी उपस्थित होते. म्हणजे एकूण १२ सहस्र ५९४ विद्यार्थी उपस्थित होते.आतापर्यंत जिल्ह्यातील अनुमाने १५ सहस्र पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला आहे. पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहर, चिंचवड, पिंपरी आणि ग्रामीण भागांत मिळून २ सहस्र माध्यमिक शाळा आहेत आणि त्यामध्ये २२ सहस्र ५२२ शिक्षक आहेत. गेल्या ३ दिवसांत ७ सहस्र ५२१ शिक्षकांची कोरोना चाचणी झाली, त्यात ५९ शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहेत.