‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या ६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले !

हिंदूबहुल भारतात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई होणे, हा हिंदूंचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न होय !

पुणे येथे कुलुपबंद शाळेमुळे वारकर्‍यांच्या मुक्कामाचे हाल !

कुलुपबंद शाळेमुळे अनेक वारकर्‍यांना स्वत:ची पथारी (बिछाना) सकाळी वाहनतळाच्या जागेत टाकावी लागली. ती जागा अपुरी असल्याने त्यांना मग शाळेकडे येणार्‍या रस्त्यावरच पथारी टाकून बसावे लागले आहे.

सिंधुदुर्ग : पहिल्याच पावसात मडुरा येथील शाळेचे छप्पर कोसळले

विद्यार्थ्यांच्या जिवाचीही काळजी नसलेल्या आणि त्यामुळे दुरुस्तीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर कडक कारवाई व्हायला हवी !

दमोह (मध्यप्रदेश) येथील गंगा जमुना शाळेची इमारत पाडणार !

पोलिसांनी शाळेशी संबंधित लोकांना अटक केली आहे. यासह शाळाचालकांच्या व्यवसायावरही धाडी टाकण्यात येत आहेत. त्यांच्या पेट्रोल पंपासह अनेक दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांची भरती व्हावी, यासाठी १६ जूनला धरणे आंदोलन !

शिक्षकांच्या रिक्त पदांविषयी गटविकास अधिकार्‍यांच्या दालनासमोर तसेच, तर १६ जून या दिवशी जिल्हा परिषद आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल – उबाठा शिवसेनेचे खासदार राऊत

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या १२१ शाळा शिक्षकांविना !

महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शिक्षकांची पदे रिक्त ठेवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणारे प्रशासन काय कामाचे ?

उष्णता वाढीमुळे गोव्यात आज शाळा बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश

गोवा राज्यात पावसाला झालेला विलंब आणि त्यासह झालेली उष्णता वाढ यांमुळे शासनाच्या शिक्षण खात्याने एका आदेशाद्वारे १० जून या दिवशी शाळा अन् उच्च माध्यमिक विद्यालये यांना सुट्टी घोषित केली आहे.

गोवा : उकाड्यामुळे शाळा एक आठवडा पुढे ढकलण्याची काही पालकांची मागणी

पालकांच्या मते, ‘‘पालकांनाच उकाडा असह्य होत असतांना पाल्यांनाही अशा वातावरणात शिकणे कठीण होणार. सध्याचे दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सियसपेक्षाही अधिक असते. यामुळे सरकारने शाळा एक आठवडा विलंबाने चालू करावी.’’

उष्णतेच्या लाटेमुळे नवी मुंबईतील शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी !

या निवेदनात त्यांनी ‘नवी मुंबईतील सर्व बोर्डाच्या शाळा १५ जूननंतर चालू करण्याच्या आदेशाचे पालन न करणार्‍या शाळांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.

हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास सांगणार्‍या शाळेची मान्यता रहित !

मध्यप्रदेशचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील दमोह येथील ‘गंगा जमना हायर सेकेंडरी स्कूल’ या शाळेची मान्यता रहित केली आहे.