परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बंगाल आणि आसाम या राज्यांतील धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. श्री. अशुतोष महतो, धुबडी, आसाम.

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना विद्युत् पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पंखे चालू नव्हते. माझा भ्रमणभाष पूर्ण भारित केलेला नव्हता. माझा भ्रमणभाष अर्धा घंटा चालू शकेल, एवढाच भारित झाला होता, तरीही मी पूर्ण सोहळा पाहू शकलो.

आ. बालसंत पू. वामन यांचा कार्यक्रम आणि प्रश्नोत्तरे ऐकतांना पुष्कळ चांगले वाटले.

इ. मला पूर्वी प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी काहीच वाटत नव्हते; परंतु शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा त्यांच्या गुरूंप्रती (प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रती) असलेला भाव पाहून मला पुष्कळ चांगले वाटले.

२. श्री. सुमन्त मुखर्जी, कोलकाता, बंगाल.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा पहातांना मला सुगंध येत होता. मला पुष्कळ चांगले वाटत होते.’

३. कु. सुतापा मुखर्जी (वय ८ वर्षे), कोलकाता

अ. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ग्रंथात पाहिले होते. सोहळ्यात दाखवण्यात येणार्‍या एका ध्वनीचित्र-चकतीत परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्यावर ‘ते भगवान श्रीविष्णु आहेत आणि साक्षात् श्रीविष्णु आमच्या घरी आले आहेत’, असे मला वाटले.’

आ. ‘जन्मोत्सव सोहळा पहातांना मला सुगंध येत होता.

४. श्री. बाबूसाहेब टुडू, आसाम

अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा पहातांना आरंभी ‘नेट’ची अडचण येत होती; म्हणून मी साधकांना भ्रमणभाष केला. त्यांनी ‘प्रार्थना करा’, असे सांगितले. मी प्रार्थना केली आणि नंतर कसलीही अडचण आली नाही.

आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा पाहून मला पुष्कळ चांगले वाटले.’

५. श्री. सोवन सेनगुप्ता, शास्त्रधर्म प्रचारसभा, कोलकाता

‘मी जन्मोत्सव सोहळ्याचा आरंभीचा भाग पाहू शकलो नाही. मी दुपारी ४.३० वाजता सोहळा पाहिला. तो अत्यंत उच्च कोटीचा आणि दिव्य होता. आपल्याला पुष्कळ धन्यवाद !’

६. डॉ. कौशिकचंद्र मल्लिक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), शास्त्रधर्म प्रचारसभा, कोलकाता

‘श्री. शंभू गवारे, मी आपले आभार कोणत्या शब्दांत मानू ? माझ्यात कृतज्ञताभाव नाही. हा भावसोहळा पहातांना ‘मी या भौतिक जगापासून कुठेतरी दूर आहे’, असे मी अनुभवत होतो.

७. मानससिंह रॉय, कोलकाता

अ. ‘या भावसोहळ्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता !

आ. येथे प्रतिदिन पुष्कळ डास चावतात; मात्र आज एकही डास चावला नाही.

इ. आज परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन पुष्कळ वेळ झाले. त्याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. रामकृष्ण परमहंस म्हणत असत, ‘गुरूंना प्रत्यक्ष भेटणे आणि त्यांचे छायाचित्र (छबी) पहाणे, एकच असते.’ हे मी आज अनुभवले.

ई. मी चांगली व्यक्ती नाही, तरीही ‘परात्पर गुरुदेव मला त्यांच्या चरणांशी घेतील’, असे मला वाटते; कारण परात्पर गुरुदेवांच्या साधकांशी माझा संपर्क आला आहे. त्यामुळे माझे जीवन सफल झाले आहे.’

८. श्री. अनिर्बान नियोगी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), कोलकाता

‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि सद्गुरु नंदकुमार जाधव किती भावपूर्ण गातात ! त्यामुळे मला पुष्कळ चांगले वाटले. संपूर्ण कार्यक्रम अतिशय चांगला होता.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (मे २०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक