परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उच्चतम आध्यात्मिक अवस्थेमागील विवेचन आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘संत’असा न करता ‘श्रीविष्णूचा अवतार’ असा करण्यामागील कार्यकारणभाव

जगाला अध्यात्माची माहिती नसल्यामुळे त्यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे केवळ संत आहेत’, असे वाटते. याउलट सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक त्यांना मिळणाऱ्या ज्ञानातून आणि सप्तर्षी नाडीपट्टीच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘श्रीविष्णूचा अंशावतार’, अशा प्रकारे करतात. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक आणि सप्तर्षी यांना ईश्वरी प्रेरणेमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दिव्यत्व लक्षात आल्यामुळे ते त्यांचा उल्लेख ‘श्रीविष्णूचा अवतार’ अशा प्रकारे करतात. कलियुगातील जिवांना धर्म आणि अध्यात्म यांचे महत्त्व लक्षात येण्यासाठी श्रीविष्णूने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाने पृथ्वीवर मानवी स्वरूपात ज्ञानावतार घेतलेला आहे. या अवताराचे माहात्म्य जगाला कळण्यासाठी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक आणि सप्तर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘अवतार’ म्हणून करतात आणि त्यांची अवतारी गुणवैशिष्ट्ये संपूर्ण जगाला सांगतात. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व, दिव्यत्व आणि त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये संपूर्ण जगाला समजल्यामुळे पृथ्वीवरील अनेक जीव परात्पर गुरु यांच्याकडे आकृष्ट होतात आणि त्यांचे सान्निध्य अन् मार्गदर्शन प्राप्त झाल्यामुळे अनेक जिवांना धर्माचरण अन् साधना करण्याची प्रेरणा मिळते. अशा प्रकारे पृथ्वीवरील समस्त जिवांचा आध्यात्मिक स्तरावरील उद्धार होण्यासाठी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ईश्वरीप्रेरणेमुळे ‘संत’ असा न करता ‘अवतार’ असा करतात.

२.  परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वत:ला गुरु न समजण्यामागील कार्यकारणभाव

कु. मधुरा भोसले

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अद्वैतावस्थेत ईश्वराशी एकरूपता अनुभवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले जेव्हा अद्वैतात असतात, तेव्हा ते श्रीविष्णूशी एकरूप झालेले असतात. त्यामुळे त्यांना स्वत:चे अस्तित्व न जाणवता ईश्वराचे अस्तित्व सतत जाणवत असते. ईश्वरी तत्त्वाच्या अनुभूती ​​​घेणाऱ्या आध्यात्मिक उन्नतांना स्वत:च्या स्थितीचा विसर पडलेला असतो. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ते ‘परात्पर गुरु’ आहेत, याचा पूर्णपणे विसर पडलेला असतो.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी द्वैतावस्थेत शिष्यभाव अनुभवणे : जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले द्वैतात येतात, तेव्हा त्यांना गुरुस्थानी असणारे प.पू. भक्तराज महाराज यांचे स्मरण होऊन ते शिष्यभावात असतात. त्यामुळे त्यांना स्वत:च्या परात्पर गुरुपदाचा विसर पडतो. ​या​ दोन्ही कारणांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये द्वैतभावात शुद्ध अहं कार्यरत असल्यामुळे त्यांना स्वत: प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य असल्याची भावना प्रबळ असते, तर शुद्ध सात्त्विक अहंचा लोप झाल्यावर प्राप्त होणारया निर्गुण अवस्थेत ईश्वराशी अद्वैत झाल्यामुळे स्वत:चा पूर्णपणे विसर पडतो. या दोन्ही कारणांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले स्वत:ला गुरु समजत नाहीत. यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांची उच्चतम अहंशून्य अवस्था कशा प्रकारची असते याची प्रचीती येते.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)

(सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.५.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.