नगरसेवक अभिजित भोसले ‘युथ लिडर इन हेल्थ केअर’ पुरस्काराने सन्मानित !

राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारतांना नगरसेवक अभिजित भोसले (डावीकडे), आरोग्यमंत्री राजेश टोपे (मध्यभागी)

सांगली, ३ ऑगस्ट (वार्ता.) – कोरोनाकाळात केलेले साहाय्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाकार्य यांविषयी नगरसेवक श्री. अभिजित भोसले यांना मुंबई येथील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘युथ लिडर इन हेल्थ केअर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. या प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. नगरसेवक भोसले यांनी लहान मुलांसाठी राज्यातील पहिले कोरोना केंद्र चालू केले. विनामूल्य रुग्णवाहिका, फिरते रुग्णालय, घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांना साहाय्य, लसीकरणात पुढाकार, मास्क वाटप यांसह अनेकविध उपक्रमात सातत्याने सहभाग नोंदवला.