मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना-भाजप कार्यकर्ते यांनी दिल्या घोषणा !
मुख्यमंत्र्यांनी निवेदन न स्वीकारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यातच धरणे आंदोलन केले. यामुळे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन त्यांची सायंकाळी सुटका केली.
मुख्यमंत्र्यांनी निवेदन न स्वीकारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यातच धरणे आंदोलन केले. यामुळे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन त्यांची सायंकाळी सुटका केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. सुमारे १५ मिनिटे बंद खोलीत ही चर्चा झाली.
आपत्तीची वारंवारता पाहिली, तर त्यांचे स्वरूप भीषण होत आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस, दरडी खचणे अशा घटना घडत असून निसर्गासमोर आपण सर्व हतबल आहोत. पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले, घाट रस्ते खचले.
परिस्थिती निवळल्यावर वीजदेयकात कितपत दिलासा देऊ शकतो, याचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिली.
सांगली येथील आयर्विन पुलाची पाणीपातळी २९ जुलै या दिवशी दुपारी २ वाजता ३९ फूट नोंदवण्यात आली. सद्यस्थितीत धरण ८६ टक्के भरले असून धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करून धरणाची….
वर्ष २०१९ मध्ये आमचे सरकार असतांना आम्ही निकषापलीकडे जाऊन साहाय्य केले. वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदाची हानी अधिक आहे. सर्वसामान्य माणसांपासून शेतकर्यांची अतोनात हानी झाली आहे.
गेल्या आठवड्यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे अतीवृष्टीने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेकांची घरे, दुकाने आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे.
राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, त्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत…
हवामान खात्याने या आठवड्यात कोयना धरण क्षेत्र आणि परिसर येथे अतीवृष्टीचा अंदाज वर्तवल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा ४० ते ४२ फुटांपर्यंत पोचण्यात शक्यता आहे.
पू. भिडेगुरुजी धारकर्यांसह केवळ दिवसाच नाही, तर रात्री-अपरात्री स्वत: पुराच्या पाण्यात उतरून पूरग्रस्तांना लागेल ते साहाय्य करत होते.