सांगली, ६ सप्टेंबर (वार्ता.) – गेली दोन वर्षे सातत्याने कोरोना संसर्गाचे कारण पुढे करून कलाकारांवर निर्बंध लादले जात आहेत. यामुळे कलाकार मंडळींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी ‘सांगली जिल्हा आर्टिस्ट असोसिएशन’च्या वतीने मारुति चौक येथे कलाकारांकडून निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात ‘सांगली जिल्हा आर्टिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष अतुल शहा, प्रदीप कुलकर्णी, अतुल ठाणेदार, भाजप सांस्कृतिक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धनराजे हसबनीस, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक ओंकार शुक्ल, सांस्कृतिक आघाडी प्रमुख अपर्णा गोसावी, रश्मी सावंत यांसह अन्य सहभागी झाले होते.